शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी सुरू करा, अन्यथा अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे आदिवासी विकास सेवा सहकारी संस्था कार्यरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ...

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे आदिवासी विकास सेवा सहकारी संस्था कार्यरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात धान व मक्याची लागवड केली. आता हे पीक विक्रीसाठी तयार आहे. मात्र, अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना कवडीमोल भावात धान विक्री करावी लागत आहे. येत्या ४८ तासांत केंद्र सुरू न झाल्यास अर्धनग्न आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून प्रादेशिक व्यवस्थापक महा. राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालय नवेगावबांध यांना दिला आहे.

आदिवासी महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर १ एप्रिलपासून खरेदीला सुरुवात सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विक्री करून शेतकरी खरिपाच्या तयारीत लागतो. मात्र, यावर्षी एप्रिल, मे आणि तब्बल जून अर्ध्यावर येऊनही आदिवासी विकास महामंडळाने अद्याप धान खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात धान विकावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन येत्या दोन दिवसांत खरेदी सुरु करा अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, गोंदिया पोलीस अधीक्षक, तसेच प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ नवेगावबांध यांना देण्यात आले. शिष्टमंडळात नरेश बोरकर, पुंडलिक ठलाल, पुरुषोत्तम चोरवाडे, पतीराम राणे, योगीराज हलमारे, धनराज हर्षे, प्रेम करंडे, रुपचंद मानकर यांचा समावेश आहे.

...... कोट

‘जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित आश्रमशाळेत धान व मका खरेदी करण्याची कार्यवाही केली; मात्र दीनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन लाख रुपये अनामत रक्कम शाळेची रंगरंगोटी व २६ जूनला शाळा खाली करून देण्याची हमी मागितली आहे; पण हे शक्य नाही त्यामुळे ही अडचण जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया व प्रादेशिक कार्यालय भंडारा यांना कळविले आहे.

- गणेश सावळे, उपप्रादेशिक अधिकारी नवेगावबांध.

...............

संस्था चालकाने मागितली उचल करण्याची हमी

जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून धान व मका खरेदीसाठी शाळा, भाडे तत्त्वावर घेण्याचे निर्देश खरेदी केंद्रांना प्राप्त झाले. त्यानुसार गोठणगाव आदिवासी सेवा सहकारी खरेदी केंद्राने दीनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळा गोठणगाव यांच्याशी संपर्क केला. संस्था संचालकांनी नोटरी मागितली त्यानुसार शाळेचा पूर्ण परिसर स्वच्छ व रंगरंगोटी व इतर अटी संस्थेने मान्य केल्या; मात्र २६ जूनला शाळा रिकामी हवी असे संस्था चालकांनी मागणी केली आहे.