शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव

By admin | Updated: August 22, 2015 00:22 IST

गुरूनानक वॉर्डातील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीला घेऊन परिसरातील चिमुकल्यांना स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना घेराव घातला.

गोंदिया : गुरूनानक वॉर्डातील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीला घेऊन परिसरातील चिमुकल्यांना स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना घेराव घातला. एवढेच नव्हे तर परिसरातील निरीक्षण करवून त्यांना दारू दुकान बंद करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. गुरूनानक वॉर्डात व्हाईट हॅवन बार एंड रेस्टॉरेंट मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. सन २००८ मध्ये बार संचालकांनी बारच्या परवान्यासाठी संबंधीत विभागाकडे अर्ज केला होता. मात्र परिसरातील नागरिकांनी याला तिव्र विरोध केला होता. परिणामी त्यांना परवाना देण्यात आला नव्हता. मात्र दोन महिन्यांपूर्वी त्यांना बारसाठी परवाना देण्यात आला. बार सुरू झाल्यामुळे या परिसरात दारूड्यांचा वावर वाढला असून त्यामुळे परिसरातील महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. शिवाय येथे कधीही दारूच्या शौकींनाकडून वादावादीची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी परिसरात रहिवाश्यांत रोष व्याप्त आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य विभागांकडे दारू दुकान बंद करण्याची मागणी केली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. यावर मात्र स्वातंत्र्य दिनी जिल्हाचे पालकमंत्री बडोले हे यामार्गाने जात असताना परिसरातील चिमुकल्यांनी त्यांना रस्त्यात अडविले. चिमुकल्यांनी पालकमंत्र्यांना गाडीतून उतरवून दारू दुकान दाखविले व परिस्थितीशी अवगत करवित दारू दुकान बंद करविण्याची मागणी करीत निवेदन दिले. यावर पालकमंत्र्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी या प्रकरणात त्वरीत कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला. (शहर प्रतिनिधी)