शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी दारूभट्ट्यांवर धाडसत्र

By admin | Updated: March 8, 2015 01:12 IST

होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन दिवसात अनेक हातभट्ट्यांवर कारवाई करून १९ कारवाया केल्या. यात अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.

गोंदिया : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन दिवसात अनेक हातभट्ट्यांवर कारवाई करून १९ कारवाया केल्या. यात अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.होळीनिमित्त होणाऱ्या अवैध मद्य निर्मिती व वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान राबविले. दि.४ व ५ रोजी राबविलेल्या या अभियानात गोंदिया ग्रामीण, गोरेगाव, सालेकसा परिसरात अनेक हातभट्ट्या उद्ध्वस्त करून हातभट्ट्यांसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. या सामूहिक मोहिमेत गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील तेजराम दयाराम साखरे या इसमाकडून १.४४ लिटर देशी दारू व काही विदेशी दारूही जप्त करण्यात आली. सालेकसा तालुक्यात टाकलेल्या धाडीत गोरे येथील रामेश्वर मुन्नालाल उईके, जमाकुडो येथील झारीपार मिलन जोडी, दुर्गुटोला येथील भूमेश्वर सजनदास राऊत आणि धनेगाव येथील गोविंद नैताम अशा ५ आरोपींना अवैध मद्य बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गोंदिया ग्रामीण परिसरात टेमनी नाल्याच्या काठावर आणि भाद्याटोला येथे टाकलेल्या धाडीत अवैध हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. त्यात ९५ लिटर मोहादारू जप्त करण्यात आली. यावेळी ५३२० लिटर मोहा सडवा जप्त करण्यात आला.गोरेगाव तालुक्यात लेंडेझरी व हेटी परिसरात टाकलेल्या धाडीत २ हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. १२०० लिटर मोहा सडवा जागीच नष्ट करण्यात आला. गोरेगाव तालुक्यात अवैधपणे मद्याची विक्री करताना सुनील तांडेकर रा.कवलेवाडा व नरेश उईके रा.नवरगाव या आरोपींना अटक करण्यात आली.या मोहिमेत एकूण १९ गुन्हे नोंदविण्यात आले. हातभट्ट्यांवरील कारवायांमध्ये ७ भट्ट्या वारस तर १२ बेवारस होत्या. सापडलेल्या ७ आरोपींना मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत अटक करण्यात आली. तसेच २ लाख ५० हजार २४५ रुपयांचा एकूण ऐवज जप्त करण्यात आला.सदर मोहिमेत अधीक्षक धार्मिक यांच्या मार्गदर्शनात देवरीचे निरीक्षक गोतमारे, गोंदियाचे प्रभारी निरीक्षक आकरे, गोंदिया शहरचे दु.निरीक्षक विडुंभ, दु.निरीक्षक (ग्रामीण) मंडलवार, बोलधने, दुय्यक निरीक्षक (देवरी) बोंडेवार, सहायक दुय्यम निरीक्षक रहांगडाले, हुमे, जवार, ढाले, पागोटे, ढोमणे, कांबळे, मुनेश्वर, फुंडे, वाहनचालक मडावी व सोनबर्से यांनी सहभाग घेतला. (जिल्हा प्रतिनिधी)