शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानातून लवकरच डिजिटल व्यवहार

By admin | Updated: December 30, 2016 00:55 IST

अर्थव्यवस्थेला रोखरहीत करण्यासाठी डिजीटल पध्दतीने आर्थिक व्यवहार करण्याचा एक भाग म्हणून

 गोंदिया : अर्थव्यवस्थेला रोखरहीत करण्यासाठी डिजीटल पध्दतीने आर्थिक व्यवहार करण्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील शिधावाटप दुकानामध्ये शिधावस्तुची किंमत अदा करण्यासाठी मोबाईलद्वारे रक्कम हस्तांतरण व ई-वॉलेट या सुविधेचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. मात्र सध्या त्यात अनेक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना शिधावस्तुचे वितरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ही कार्यवाही शिधावस्तू खरेदी करताना रोख रक्कम रास्तभाव दुकानदारास देतात. शासन निर्णयानुसार यु.एस.एस.डी. व ई-वॉलेट पध्दतीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांनी रास्तभाव दुकानातून शिधावस्तूची उचल जानेवारी २०१७ पासून करावी लागणार आहे. सर्व रास्तभाव दुकानदारांनी त्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत त्वरित काढावे व आपला मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न करु न घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र काही रेशन दुकानदारांनी या प्रणालीला हरकत घेत मशिनचे, विद्युतचे भाडे सरकारने द्यावी अशी मागणी केली आहे. नवीन प्रणालीनुसार प्रत्येक रास्तभाव दुकानात कॅशलेस व्यवहाराबाबतचा फलक प्रदर्शित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रास्तभाव दुकानातील शिधावस्तुची विक्री पी.ओ.एस.द्वारे करण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी व शिधापत्रिकाधारकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया यांनी केले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)