शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सोनालीच्या मृत्यूप्रकरणातील संशयित अजूनही मोकळा

By admin | Updated: August 27, 2015 02:06 IST

सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे या तरूणीच्या संशयास्पद

नेत्यांचा दबाव कुचकामी : तपास अधिकारी बदलविलागोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे या तरूणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दिवसेंदिवस असंतोष वाढत असताना पोलिसांनी अजूनही संशयित आरोपीविरूद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य गुप्तचर विभागामार्फत (सीआयडी) करावा अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान प्रकरणाचा तपास उपनिरीक्षकाकडून काढून तो सालेकसा ठाण्याचे निरीक्षक (ठाणेदार) एम.के. खंदारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.आरतीला जिवंत जाळून तिचा मृतदेह विहीरीत टाकण्यात आल्याचा संशय आहे. या संदर्भात मृत मुलीच्या नातेवाईकांनी गावातीलच तंटामुक्त समितीचा अध्यक्ष योगराज ऊर्फ मुन्ना हेमराज चकोले (२८) याच्यावर खुनाचा संशय व्यक्त केला. या प्रकरणात तपासी अधिकारी दिरंगाई करीत असल्याचा आरोप होत असल्यामुळे आता या प्रकरणाचा तपास स्वत: सालेकसाचे ठाणेदार एम.के. खंदारे करीत आहेत.योगराजने सहा महिन्यांपुर्र्वी आरतीशी प्रेमसंबंध जुळविण्याचा प्रयत्न केला होता. नेहमी तिच्या मागे-मागे जाऊन तिला त्रास द्यायचा. या प्रकरणाची तक्रार तिने आई वडिलांकडे केली. आईवडीलांनी या संदर्भात सालेकसा पोलिसात तक्रार केली. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तंटामुक्त समितीतून समजोता करा असे सांगून स्टँप पेपरवर चकोले याने याने यानंतर त्रास देणार नाही असे लिहून दिले होते. या प्रकरणात आरतीचा छळ करणाऱ्या योगराजविरूध्द सर्व पुरावे तपासण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात मृत्यूचे स्पष्ट कारण नमूद न केल्यामुळे येणाऱ्या व्हिसेरा रिपोर्टवर अवलंबून राहावे लागणार आहे. परंतु आरतीच्या नातेवाईकांनी स्पष्टपणे संशयित आरोपीचे नाव घेतले असताना पोलिसांना त्याच्या मोबाईल नंबरचे डिटेल्स किंवा इतर कोणतीही माहिती काढण्यासाठी इतका वेळ का लागत आहे याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. संशयित आरोपीकडे नेमका कोणता मोबाईल नंबर होता याबाबतही माहिती घेणे गरजेचे आहे.दरम्यान, आ.संजय पुराम, जि.प. अध्यक्ष सविता पुराम यांच्यासह विविध संघटना आता या प्रकरणात कारवाई करण्यासाठी दबाव टाकत आहेत. मात्र पोलिसांनी अद्यापही हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही. (तालुका प्रतिनिधी)