शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून संकटमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध समस्या व प्रश्न सोडवून त्यांना संकटमुक्त करा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता ...

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध समस्या व प्रश्न सोडवून त्यांना संकटमुक्त करा यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष जिल्हा किसान आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि.९) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेेदनात, ई-पीक नोंदणी ॲपची क्लिष्ट अट तत्काळ रद्द करावी, खरीप हंगामात पावसाअभावी रोेवणी न झालेल्या शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, गादमाशीचा प्रादुर्भाव झालेल्या धान पिकाची पाहणी करून नुुकसानभरपाई देण्यात यावी, धडक सिंचन विहीर योजनेचे प्रलंबित चुकारे शेतकऱ्यांना तातडीने द्यावे, युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने त्यावर कारवाई करण्यात करून युरिया उपलब्ध करण्यात यावा, कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, थकीत कृषिपंपाची जोडणी धान पीक परिवक्व होईपर्यंत कापू नये व थकीत माफ करावे, रानडुकराच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्याना नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्या नमूद आहेत.

निवेदन देताना भाजपा जिल्हाध्यक्ष केशव मानकर, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, गोपालदास अग्रवाल, खोमेश रहांगडाले, रमेश कुथे, भेरसिंग नागपुरे, नेतराम कटरे, संजय कुलकर्णी, संजय टेंभरे, भावना कदम, हनवत वट्टी, दीपक कदम, धनलाल ठाकरे, भाऊराव कठाने, साहेबलाल कटरे, अशोक लंजे, नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, पंकज रहांगडाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

------------------------------

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्ह्यात यंदा पावसाने दगा दिला असून, सरासरीपेक्षा ४० टक्के पाऊस कमी पडल्यामुळे धान पिकाची लावलेली रोपे गंभीर अवस्थेत आहेत. ही स्थिती बघता यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याने चित्र दिसून येत आहे. अशात पंचनामे करून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणीही भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.