शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

शिबिरातून शोधले ‘समाधान’

By admin | Updated: September 1, 2015 01:57 IST

महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून सुवर्ण जयंती राजस्व अभियान योजनेंतर्गत धनेगाव (दरेकसा) येथे माँ कंकाली

दरेकसा : महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून सुवर्ण जयंती राजस्व अभियान योजनेंतर्गत धनेगाव (दरेकसा) येथे माँ कंकाली देवस्थान कचारगढच्या प्रांगणात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागात या शिबिराच्या निमित्ताने अधिकारीगण उपस्थित असल्याने नागरिकांनी विविध प्रकारच्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यावर अधिकाऱ्यांनीही योग्य तो प्रतिसाद देत त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.या शिबिराचे उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशीे होते. दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सालेकसाचे तहसीलदार सांगोळे, जमाकुडोच्या सरपंच किरण मोहबे, कोसमतर्राच्या सरपंच पूजा वरकडे व तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.या शिबिरात विद्यार्थ्यांचे जाती प्रमाणपत्रासाठी कागदपत्र तयार करुन देण्यात आले. तसेच शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी खंडविकास अधिकारी मोटघरे, उपविभागीय अभियंता नागभिरे, अभियंता दमाहे, प्राचार्य रहांगडाले व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिनेश रहांगडाले यांनी व आभार तहसीलदार सांगोडे यांनी मानले. (वार्ताहर)नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा४या शिबिरामध्ये लोकांनी आपली आपली समस्या मंचावर ठेवली. विशेष म्हणजे मानव विकास कार्यक्रमांतर्गत चालविण्यात येणाऱ्या एसटी बसला चांदसुरज चौकी, विचारपूरपर्यंत विस्तारीत करण्यात यावे याबाबतचे निवेदन श्री गुरुदेव हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी एसडीओ सूर्यवंशी यांना दिले. ही बसफेरी त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच धनेगाव ते बंजारी रस्त्याचे हाल दयनीय आहे. बसने येणाऱ्यांकरिता असुविधा होत आहे. कोसमतर्राचे उपसरपंच बारेलाल वरकडे यांनी ज्योत विसर्जनाकरिता कचारगडमध्ये पाणी टंचाई राहात असल्यामुळे दोन बंधाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले.