शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार ४०८ नमुन्यांचे करणार माती परीक्षण

By admin | Updated: June 2, 2016 01:12 IST

पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मातीतून उपलब्ध होत असल्याने खतांची मात्रा ठरविण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे.

५० टक्के नमुने तयार : राष्ट्रीय आरोग्य पत्रिका अभियानगोंदिया : पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मातीतून उपलब्ध होत असल्याने खतांची मात्रा ठरविण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती परीक्षणानंतर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते व त्यानुसार अधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य खतमात्रा ठरविता येते. त्यासाठी जिल्हा कृषी विभागाला माती परीक्षणासाठी जिल्हाभरातून एकूण २८ हजार ४०८ नमुन्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती कृषी विभागाला मार्च २०१७ अखेरपर्यंत करावयाची आहे.राष्ट्रीय आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टानुसार, गोंदिया तालुक्यातून पाच हजार ८७४ मातीचे नमुने, गोरेगाव तालुक्यातून चार हजार २२६, तिरोडा तालुक्यातून पाच हजार ८८५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून तीन हजार ६४६, देवरी तालुक्यातून एक हजार ८१२, आमगाव तालुक्यातून दोन हजार ८८९, सालेकसा तालुक्यातून एक हजार ७२३ व सडक-अर्जुनी तालुक्यातून दोन हजार ३४३ असे एकूण २८ हजार ४०८ मातीचे नमुने घेण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत जिल्हाभरातून ५० टक्के मातीचे नमुने घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नमुन्यांच्या परीक्षणानंतर त्यांचा तपासणी अहवाल शेतकऱ्यांना दिला जाईल. त्यानुसार शेतकरी खताची मात्रा ठरवून शेतपिकांना देतील. मागील वर्षी माती परीक्षणासाठी एकूण १४ हजार ४०८ नमुन्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात गोंदिया तालुक्यातील २ हजार २४७, गोरेगाव १ हजार २१४, तिरोडा २ हजार ८५६, अर्जुनी-मोरगाव १ हजार ७८६, देवरी १ हजार ३९४, आमगाव १ हजार ८०९, सालेकसा १ हजार ७९ व सडक-अर्जुनी तालुक्यातील १ हजार ८१९ नमुन्यांचा समावेश होता. या नमुन्यांची तपासणी करून त्याचा अहवाल शेतकऱ्यांना देवून १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केली होती. (प्रतिनिधी)यावर्षी ४० टक्केपेक्षा जास्त लागवड श्री पद्धतीनेजिल्ह्यात १ लाख ९० हजार हेक्टरमध्ये भात पिकाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. यात श्री पद्धतीने २० टक्के व सुधारित श्री पद्धतीने (ओळीत लागवड) ४० ते ४५ टक्के लागवड करण्यात येणार आहे. तसेच १०० हेक्टरमध्ये मका, सात हजार ४०० हेक्टरमध्ये तूर, मूग, उडीद व इतर कडधान्य प्रत्येकी १०० हेक्टर, १ हजार २०० हेक्टरमध्ये तीळ, १० हेक्टरमध्ये भाजीपाला व १ हजार २०० हेक्टरमध्ये ऊस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे.गरजेपेक्षा जास्त खत देऊ नकाउत्पादन पूर्ण क्षमतेने घेण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या घटकास मोठे महत्व आहे. गरजेपेक्षा कमी अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध झाल्यास त्यांची वाढ खुंटते व उत्पादन कमी होते. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त खते दिल्यास पिकांवर व जमिनीवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे आरोग्य पत्रिकेतून आपल्या शेतजमिनीला किती खताची मात्र गरजेची आहे हे पाहूनच खत देणे गरजेचे आहे. पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मातीतून उपलब्ध होत असल्याने खतांची मात्रा ठरविण्यापूर्वी माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. माती परीक्षणानंतर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते व त्यानुसार योग्य खतमात्रा ठरविता येते. मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत सन २०१५-१६ ते २०१७-१८ या तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व गावांत माती परीक्षण करून सर्व शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका वितरित करण्यात येणार आहे.