शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनातून समाजप्रबोधन आजही काळाची गरज

By admin | Updated: December 3, 2015 02:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. समाज प्रबोधनाचा वसा पुढे चालवत संत जैपालदास महाराज यांनी

पालकमंत्री बडोले : संत जैपालदास महाराज जन्मशताब्दी कार्यक्रमगोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. समाज प्रबोधनाचा वसा पुढे चालवत संत जैपालदास महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा नष्ट करुन गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य अखंडीतपणे केले. कीर्तनातून समाजप्रबोधन ही आजच्याही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.संत जैपालदास महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवनिमित्त तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे २९ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. महोत्सव आयोजन समिती व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य तुषार सूर्यवंशी यांचे प्रबोधनात्मक किर्तन यावेळी झाले. कार्यक्र्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तथागत गौतमबुद्ध या लोकप्रिय चित्रपटाचे अभिनेते गगन मालिक, उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, अखिल विश्वगायत्री परिवारचे जिल्हा समन्वयक मुकुंद भैरम, जिल्हा परिषद मनोज डोंगरे, पंचायत समिती सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, सरपंच देवेनबाई पारधी, उपसरपंच पुरणलाल भैरम उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार यावेळी ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, तिरोडा तालुक्यातील उत्कृष्ट महिला बचत गट, उत्कृष्ट शेतकरी, गुणवंत विद्यार्थी तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक चेतन भैरम यांनी तर प्रा.बबन मेश्राम यांनी संचालन केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. कार्यक्रमाला कवलेवाडा येथील ग्रामपंचायतचे सदस्य, गावकरी, युवक-युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रबोधनातून गावकरी भारावलेयाप्रसंगी खंजेरीवादक तुषार सूर्यवंशी यांनी खंजेरीवादनातून ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा, संविधानाच्या अभ्यासाबाबत जनजागृती, हुंडाप्रथा, शैक्षणिक जनजागृती, सर्वधर्म समभाव या विषयांवर जनप्रबोधन केले. विविध कार्यक्रमाच्या सादरीकरणातून जनजागृती करण्यात आली. स्पर्धा परीक्षाची तयारी, कौशल्य विकास कार्यक्रमावर आधारित मागदर्शन करण्यात आले.