शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत २६००० बाधितांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:37 IST

जिल्ह्यात गुरुवारी (दि.२९) ५२० बाधितांनी कोरोनावर मात केली. तर, ५७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ रुग्णांचा शासकीय आणि खासगी ...

जिल्ह्यात गुरुवारी (दि.२९) ५२० बाधितांनी कोरोनावर मात केली. तर, ५७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ५७४ रुग्णांमध्ये सर्वाधिक २०५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ३६, गोरेगाव ८, आमगाव ६८, सालेकसा ६३, देवरी ४०, सडक अर्जुनी ८८, अर्जुनी मोरगाव ६५ आणि बाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १३३३३२ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०७७६३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲण्टिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १३४९२७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११६४०२ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ३२४८६ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी २६००० हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर, सद्य:स्थितीत ५९६३ कोरोना ॲक़्टिव्ह रुग्ण असून ५७७७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

....................

दीड लाखांवर नागरिकांचे लसीकरण

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनाकडून लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५४ हजार १०९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न केले जात आहे.

...........