शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आतापर्यंत 26000 बाधितांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी (दि.२९) ५२० बाधितांनी कोरोनावर मात केली. तर, ५७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ५७४ रुग्णांमध्ये सर्वाधिक २०५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ३६, गोरेगाव ८, आमगाव ६८, सालेकसा ६३, देवरी ४०, सडक अर्जुनी ८८, अर्जुनी मोरगाव ६५ आणि बाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. 

ठळक मुद्दे५७४ नवीन रुग्णांची नोंद : १३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. सुरुवातीला एक रुग्ण असलेली रुग्णसंख्या वाढत गेली. मात्र, कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २६००० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर, रुग्णसंख्येतसुद्धा सातत्याने घट होत असल्याची बाब समाधानकारक आहे. जिल्ह्यात गुरुवारी (दि.२९) ५२० बाधितांनी कोरोनावर मात केली. तर, ५७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ५७४ रुग्णांमध्ये सर्वाधिक २०५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ३६, गोरेगाव ८, आमगाव ६८, सालेकसा ६३, देवरी ४०, सडक अर्जुनी ८८, अर्जुनी मोरगाव ६५ आणि बाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १३३३३२ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०७७६३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲण्टिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १३४९२७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११६४०२ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ३२४८६ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी २६००० हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर, सद्य:स्थितीत ५९६३ कोरोना ॲक़्टिव्ह रुग्ण असून ५७७७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या