शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोअंतर्गत लावलेल्या झाडांची महावितरणकडून कत्तल

By admin | Updated: June 5, 2015 01:51 IST

मान्सूनपूर्व विजेच्या तारांना झाडांच्या फांद्या स्पर्श करू नये म्हणून वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून करण्यात येते.

युवराज वालदे चिखलीमान्सूनपूर्व विजेच्या तारांना झाडांच्या फांद्या स्पर्श करू नये म्हणून वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून करण्यात येते. मात्र फांद्या कापण्याच्या नावाखाली शतकोटी वृक्ष लागवट योजनेतील रोजगार हमी योजनेतून जगविण्यात आलेली झाडे बुंध्यापासून कापण्यात आल्याने शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत.सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया परिक्षेत्र देवरीअंतर्गत सन १२-१३ वर्षात कोहमारा, चिखली राज्य मार्गावर २.५० कि.मी. अंतर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत बिहार पॅटर्ननुसार २५०० रोपटे लागवट करुन तीन वर्षात वृक्षात रुपांतर करण्यासाठी १६ लाख ८६ हजार ९१३ रुपये किमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. सामाजिक वनीकरण विभागाकडून झाडांची योग्य वाढ करुन वादळ, ऊन, पाऊस व रोगांपासून ते जनावरांपासून सुरक्षित जगवून वृक्षात रुपांतर झाल्याने नुकतेच ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्यात आले होते. विद्युत विभागाने मात्र कोणतीही दया-माया न दाखविता बुंध्यासकट झाडे कापल्याने शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. शासन एकीकडे झाडे जगविण्यासाठी विविध योजना राबवित असताना शासनाचेच एक अंग असलेल्या वीज वितरण कंपनीकडून मात्र झाडे कापण्याचा सपाटा लावल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. सामाजिक वनीकरण विभाग देवरी येथील वृक्ष लागवड अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ श्कला नाही. मात्र येथीलच एका कर्मचाऱ्याने वृक्ष ग्रामपंचायतला हस्तांतरीत झाल्याने आम्ही काही करु शकत नाही, असे सांगितले.यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन शासनाच्या कार्यक्रमाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या महावितरण कंपनीला याबाबत जाब विचारावा अशी मागणी होत आहे.