शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास प्रशिक्षण मेळावा १९ व २० रोजी

By admin | Updated: May 18, 2015 00:47 IST

मार्गदर्शनाच्या अभावामुळे युवक-युवतींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. स्वयंरोजगाराची कास धरण्यासाठी आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ....

गोंदिया : मार्गदर्शनाच्या अभावामुळे युवक-युवतींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. स्वयंरोजगाराची कास धरण्यासाठी आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरी मिळावी यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी पुढाकार घेऊन गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी १९ व २० मे रोजी सकाळी ९.३० वाजता येथील पवार सांस्कृतिक भवन येथे अभिनव मोफत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात ७८ प्रकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ४९ विविध कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांच्या व बार्टीच्या तज्ञ प्रतिनिधींची उपस्थिती व त्यांच्याकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांची पात्रता, कल व गुणवत्ता पाहून बार्टी यांच्याकडून कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी जागेवरच निवड करुन उमेदवारांचा प्रशिक्षणाचा हजारो रुपयांंचा संपुर्ण खर्च करणार असून उमेदवारांना प्रशिक्षणानंतर नोकरीची व पगाराची संधी मिळणार आहे. अनुसूचित जमातीमधूनही अत्यंत गरजू व गुणवत्ताधारक उमेदवार मिळाल्यास, काही उमेदवारांची अनुसूचित जातीच्या उमेदवारांप्रमाणे निवड केली जाणार. तर खुला वर्गातील उमेदवारांची अनुसूचित जातीच्या उमेदवारांप्रमाणे निवड करुन संपुर्ण खर्च बार्टी करणार आहे. खुला प्रवर्ग, इतर मागासप्रवर्गीय, विभुक्त जाती व भटक्या जमाती मधून दारिद्रय रेषेखाली असलेल्या उमेदवारांची नोंदणी करुन त्यांनाही कौशल्य विकासाच्या माध्यमातून बेरोजगारीतून मुक्त करण्यासाठी ठराविक प्रशिक्षण मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा बार्टीचा प्रयत्न आहे.मेळाव्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास तसेच महामंडळाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र व बँकेद्वारे त्यांच्या विविध योजनांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)