शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सहा गेले आणि दोनच आले

By admin | Updated: June 7, 2017 00:12 IST

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अगोदरच अव्यवस्थित असलेल्या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण

कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण : पालिकेचा कारभार विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अगोदरच अव्यवस्थित असलेल्या नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण त्यात आता अधीकची भर घालत आहे. पालिकेतील महत्वपूर्ण विभागातील सहा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले आहे. तर त्यांच्या जागी फक्त दोनच कर्मचारी आले आहेत. सहा गेले आणि दोनच परत आल्याने पालिकेतील कारभार विस्कळीत झाला असून दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम पडत आहे. अजब-गजब कारभासाठी नगर परिषद तशीही ओळखली जाते. त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पालिकेचा कारभारही व्यवस्थित नाही. परिणामी कित्येक कामे करावयाची असतानाही कर्मचाऱ्यांअभावी ती कामे करता येत नाहीत. याचा फटका सुद्धा पालिकेला सहन करावा लागतो हे सुद्धा दिसून येते. तरिही पालिकेचे कामकाज कसेबसे एकाच्या खांद्यावर दुसऱ्याची जबाबदारी टाकून कसे तरी उरकण्याची प्रथा सुरू होती. यात उशीरा का होईना काही तर होत आहे याचा दिलासा पालिका प्रशासनाला होता. असे होत असतानाच मात्र पालिकेत कार्यरत राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. हे स्थानांतरण सुध्दा तडफाफडकी स्वरूपाचे होते व कर्मचाऱ्यांना त्वरीत नव्या जागी रूजू होण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. त्यामुळे स्थानांतरण झालेले सहा कर्मचारी आदेशानुसार आपापल्या ठिकाणी रुजू झाले. सहा कर्मचारी येथून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त पडून होत्या त्याचा परिणाम ते बघत असलेल्या कामकाजावर पडत आहे. असे असताना मात्र सहा कर्मचाऱ्यांच्या जागांवर फक्त दोनच कर्मचारी पालिकेत रूजू झाले आहेत. सहा गेले आणि दोनच आले अशी स्थिती पालिकेत आहे. विशेष म्हणजे स्थानांतरण झालेल्या या कर्मचाऱ्यांमुळे ते निगडीत असलेल्या विभागाचा कारभारच विस्कटला आहे. अशात त्याचा परिणाम नगर पालिकेच्या कामकाजावरही पडणार आहे. त्यामुळे आता रिक्त पडून असलेल्या त्यांच्या जागांवर नवे कर्मचारी आल्यावरच कारभार सुरळीत होण्याचे म्हणता येईल. मात्र या कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणामुळे पालिकेतील मॅकेनिक, प्रधानमंत्री आवास, कोर्ट, विद्युत, बांधकाम यासह अन्य काही विभागांचा कारभार विस्कळीत झाला आहे. बांधकाम विभाग वाऱ्यावर नगर पालिकेतील बांधक ाम विभागाचा तसाही कुणी वाली नव्हता. त्यात आता कावडे व कोरडे यांचे स्थानांतरण झाल्याने विभागात कार्यरत तीन कंत्राटी अभियंत्यांच्या भरवशावर विभागाचा कारभार आला आहे. कारण, नगर परिषद अभियंत्याचा प्रभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बारई यांच्याकडे आहे. त्यात कावडे व कोरडे कसे तरी कारभार चालवित होते. आता मात्र त्यांचेही स्थानांतरण झाल्याने विभागात कंत्राटी अभियंता सोडून अन्य कुणीच उरले नाहीत. विशेष म्हणजे कोर्ट एजंट म्हणून काम बघत असलेले लिमये यांचेही स्थानांतरण झाल्याने आता कोर्टाचे प्रकरण बघायला कुणीही नाही. कोर्टाचे कामकाज सांभाळणे साधारण काम नसल्याने आता कुणाकडे हे काम द्यावे असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.