शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
2
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
3
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
4
Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!
5
Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या
6
दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक...., भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक सेक्स वर्कर, धक्कादायक माहिती समोर  
7
दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
8
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
9
Video - बुद्धिबळाची 'राणी'! ८ वर्षांच्या मराठमोळ्या लेकीचा जगभरात डंका; विमानात जंगी स्वागत
10
आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष
11
पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
12
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
13
गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार
14
शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू
15
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
16
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
17
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
18
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
19
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
20
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’

कवलेवाडा प्रकरणातील सहा जण डिस्चार्ज

By admin | Updated: July 6, 2014 23:58 IST

बहुचर्चित कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे हत्याकांडात असलेल्या आरोपावरून सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना पुराव्याअभावी व पोलिसांच्या तपासात आढळलेल्या वेगळ्याच

गोंदिया : बहुचर्चित कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे हत्याकांडात असलेल्या आरोपावरून सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना पुराव्याअभावी व पोलिसांच्या तपासात आढळलेल्या वेगळ्याच प्रकारामुळे त्या सहा जणांना या गुन्ह्यातून न्यायालयाने ३० जून रोजी कलम १६९ सीआरपीसी अन्वये डिस्चार्ज (गुन्ह्यातून कमी) केले.गोरेगाव तालुक्याच्या कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांची हत्या त्यांची पत्नी देवका खोब्रागडे (४५) व तिचा प्रियकर राजू गडपायले (४१) यांनी केला. मात्र या घटनेत मृत्यूपूर्वी बयाणात संजय खोब्रागडे यांनी गावातील ऋषिपाल चैतराम टेंभरे (४३), भाऊलाल शिवलाल हरिणखेडे (४७), श्रीप्रकाश हेतराम रहांगडाले (५१), पूनाजी प्रेमलाल ठाकरे (५७), हेमंत पुना ठाकरे (२९) व माधुरी ऋषिपाल टेंभरे (३५) यांनी जमिनीच्या वादातून पेट्रोल टाकून जाळल्याचे सांगितले होते. परंतु संजय खोब्रागडेला झोपेची गोळी देऊन त्याच्यावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रकार पत्नी देवका व तिचा प्रियकर राजू गडपायले याने केल्याचे पुरावे पोलिसांनी गोळा करून न्यायालयात सादर केले. या प्रकरणात १० जून २०१४ रोजी या घटनेचे साक्षीदार नेतराम चतर रहांगडाले (६०) व तेजलाल चुन्नीलाल रहांगडाले (४१) या दोघांचे १६४ सीआरपीसी प्रमाणे न्यायाधीशासमोर बयाण नोंदविण्यात आले. ११ जून रोजी भरत हिरालाल चौधरी (३५), संतोष योगराज पारधी (२९) व छन्नीलाल जुगराज पटले (४५) रा. इसाटोला या तिघांचे १६४ सीआरपीसीप्रमाणे न्यायाधीशासमोर बयाण नोंदविण्यात आले. या प्रकरणात आरोप असलेल्या सहा जणांना ३० जून रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गोंदिया येथील न्यायाधीश भगत यांनी डिस्चार्ज केले. या प्रकरणात गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३०२, ३४ सहकलम ३ (१), (१०) ३ (२), (५) अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात या सहा जणांचा समावेश नसल्याने या प्रकरणात ३०२, ३४ कलम ठेवून उर्वरित सर्व कलमा कमी करण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)