शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

झुडपी जंगल होणार संरक्षित वन

By admin | Updated: May 29, 2016 02:00 IST

झुडपी जंगलाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक झुडपी जंगल वनविभागाच्या अखत्यारित आहे.

उपवनसंरक्षक रामगावकर : १० हजार हेक्टरवरील वनहक्क दावे मंजूर केलेनरेश रहिले गोंदियाझुडपी जंगलाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक झुडपी जंगल वनविभागाच्या अखत्यारित आहे. तर दुसरे झुडपी जंगल महसूल (राजस्व) विभागाच्या ताब्यात आहे. महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या झुडपी जंगलाला वनविभागाने आपल्या ताब्यात घ्यावे, अशी मोहीम १९९३ ला चालवली होती. त्यात ३ हेक्टरपेक्षा अधिक असलेल्या झुडपी जंगलाच्या जमीनीला आपल्या ताब्यात घेऊन त्यावर वृक्ष संवर्धन करायचे होते. परंतु ३ हेक्टरपेक्षा कमी झुडपी जंगल असेल त्यांना घेता आले नाही. कारण त्यात वृक्ष लागवड करता येणार नाही किंवा त्याचे संवर्धन करता येणार नाही. परंतु महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २१ हजार हेक्टर झुडपी जंगलाला संरक्षित वन म्हणून घोषित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी दिली लोकमतला दिली. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत रामगावकर यांनी सांगितले, गोंदिया जिल्ह्यात वन जमीनीवर लोकांचे अतिक्रमण काढण्यासारखे नाही.वनालगत राहणारे लोक वन जमीनीवर शेती करतात त्यांचे दावे वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत मान्य किंवा अमान्य करण्याची कार्यवाही सुरू आहे. या अधिनियमाचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश लोकांना झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० हजार हेक्टर वन जमीनीच्या जवळपास जमीनीचे पट्टे लोकांना देण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात एक लाख ७० हजार हेक्टरमध्ये वन आहे. यापैकी यंदा २०० हेक्टर वन जमीनीवर आग लागली. त्यात मोठे नुकसान काहीच नाही. पाला-पाचोळा व गवत जळाले. मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात आग आहे. यावर्षी वनविभागाने १५० फायर ब्लोअर मागविण्यात आले होते. त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आले. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही तेवढाच प्रमाणात तेंदूपत्ता संकलन होणार आहे. आतापर्यंत ८० टक्के तेंदूपत्ता संकलीत करण्यात आला आहे. तेंदूपत्ता संकलनाचे काम कंत्राटदारांकडे असते. त्यांना तेंदूपत्ता संकलन करण्यात कुठलीही अडचण झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या नाहीत. नुकतीच बौध्द पौर्णिमेला प्राणी गणना झाली. परंतु ही प्राणी गणना प्राण्याचे अस्तीत्व आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आहे. परंतु या गणनेच्या वेळी त्या पाणवठ्यावर एखादा प्राणी दिसला नाही म्हणजे या जंगलात तो प्राणी नाही असे आपल्याला गृहीत धरता येणार नाही. या प्राणी गणनेत बिबट, अस्वल, हरिण, काळविट असे प्राणी दिसलेत. गोंदिया जिल्ह्यातील ५० गावे ग्रामवन करण्याच्या मार्गावर आहेत. त्या गावांचा प्रस्ताव आम्ही शासनाला पंधरा दिवसापूर्वी पाठविला आहे. ग्रामवनाची ही नवसंकल्पना शासनाने पुढे आणली त्यातून लोकांचा जंगलसंरक्षणासाठी लोकसहभाग वाढत आहे. गावाजवळील वनांचे संरक्षण करणाऱ्या लोकांना जंगलातील गौण खनिज वापरण्याचा अधिकार आहे. सामूहिक वनहक्क अधिनियमांतर्गत ३७ हजार हेक्टर वनातून ३३ प्रकारचे गौण वनोपज गोळा करण्याचा अधिकार गोंदिया जिल्ह्यातील संयुक्त व्यवस्थापन समित्या करीत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणून देवरी तालुक्याच्या गडेगाव येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने १५० क्विंटल मोहफूल गोळा करून ते दिड लाखात दोन दिवसापूर्वी विक्री केले आहेत. त्यामुळे वनालगत असलेल्या लोकांनी ग्रामवनची संकल्पना राबवून वनांचे संरक्षण करावे व वनोपजातून गावाचा विकास करण्याचे आवाहन रामगावकर यांनी केले.