शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी कुणाच्या खांद्यावर !

By admin | Updated: December 30, 2016 00:56 IST

तालुक्याला शैक्षणिक, औद्योगिक महत्वाचे स्थान असल्याने विविध मार्गावर पायदळ चालणारे नागरिक तर दुसरीकडे दुचाकी,

काळीपिवळी वाहन चालकांची मुजोरी : अल्पवयीनांच्या हातात दुचाकी वाहन आमगाव : तालुक्याला शैक्षणिक, औद्योगिक महत्वाचे स्थान असल्याने विविध मार्गावर पायदळ चालणारे नागरिक तर दुसरीकडे दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ नवीन बाब नाही. परंतु या मार्गावर होणारी वर्दळ सुरक्षेला तडा लावत आहे. वाहतुकीची जबाबदारी असलेले विभाग माघारी फिरत असल्याने अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. राज्य सीमेवर असलेले आमगाव शहर छत्तीसगड, मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी व्यवसायाने सुविधाजनक स्थळ आहे. शहरातून राज्य मार्गावरील वाहतूक नियमित आहे. शहरातील आंबेडकर चौक, मानकर गुरुजी चौक, कामठा चौक, गांधी चौक, देवरी मार्ग, गोंदिया मार्ग यावर वाहनांची वर्दळ व नागरिकांची गर्दी असते. वाहनांना थांबा नसला तरी मर्जीप्रमाणे वाहनांची पार्किंग करण्यात येते. त्यामुळे पायदळ चालणाऱ्या व्यक्तींना अपघातांना समोर होवून मार्ग काढावा लागतो. शहरातील आंबेडकर चौक येथे काळी-पिवळी वाहनांची वर्दळ सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. काळीपिवळी वाहन चालकांच्या मुजोरशाहीपुढे दुय्यम परिवहन विभाग व पोलीस विभाग हतबल ठरले आहे. या विभागाच्या आपसातील देवाण-घेवाणीपुढे मात्र नागरिकांचा जीव टांगणीला आहे. राज्य मार्गावर धावणारी अनेक काळी-पिवळी वाहने विनापरवाना, विनापार्किंगलाईट, विना लाईटने बिनधास्त राज्य मार्गावर धावत आहेत. परंतु परवाना नुतनीकरण करणारे विभाग फक्त कागदांचा पिठाऱ्यावर परवाना स्वीकारुन मुदत वाढवत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांवर बोट ठेवणार कोण? असा प्रश्न पुढे आला आहे. शहरात वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी स्थानिक पोलीस वाहतूक विभागाला पोलीस खात्यानेच नजरबंद केले आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस विभागातील कर्तबगार कर्मचारी आपल्या जबाबदारीपासून पळवाटा काढत असल्याचे पुढे दिसत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या जीवावर येऊन पडली आहे. अनियमित वाहतूक व अस्तव्यस्त पार्किंग या समस्या शहरात आवासून उभ्या आहेत. शहराच्या मुख्य राज्यमार्गावर रस्ते सीमेलगत वाहन पार्किंगसाठी वाहतूक विभागाने सीमारेषा उतरविल्या होते. परंतु या सीमारेषांच्या आत मुख्य मार्गावर वाहनांची पार्किंग वाहतूक विभागाच्या नजरेसमोर आहे. परंतु कारवाई मात्र शून्य आहे. वाहतुकीच्या कायद्यावर बोट घालण्यासाठी पोलीस विभागाने राज्य परिवहन विभागाकडे कर्तव्य असल्याचे उघडपणे नजरा टाकल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची जबाबदारी सांभाळणारे विभाग कोणते हा विषय नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. (शहर प्रतिनिधी)