शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

शॉटसर्किटने घराला लागली आग

By admin | Updated: July 2, 2017 00:23 IST

एकाच घरात राहत असलेले बेनीराम अंबुले, घनश्यम बेनीराम अंबुले व यशवंत बेनीराम अंबुले यांच्या घराला

सुमारे पाच लाखांचे नुकसान : परिवार आले उघड्यावर लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : एकाच घरात राहत असलेले बेनीराम अंबुले, घनश्यम बेनीराम अंबुले व यशवंत बेनीराम अंबुले यांच्या घराला शॉट सर्कीटने सकाळी ७.३० वाजता आग लागली. या आगीत तिन्ही घरातील सामानाची नासधूस झाली असून यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ््यात घराला आग लागल्याने अंबुले परिवार उघड्यावर आले आहे. शॉट सर्कीटने अचानक सकाळी आग लागल्याने अंबुले परिवारची धावपळ सुरू होती. आग लागल्याची बाब लक्षात येताच गावकऱ्यांनीही मदतीसाठी धाव घेतली व अदानी पावर प्लांटच्या अग्नीशमनला बोलाविले. मात्र तोवर घरातील सामानाची नासधूस झाली होती. त्यात घराच्या छतावर जनावरांसाठी तणस ठेवले होते व आगीने तेही जळून खाक झाले. या आगीमुळे अंबुले परिवार उघड्यावर आले असून यात त्यांचे सुमारे पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद तलाठी स्मिता बारसे यांनी पंचनाम्यात केली. घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार डब्ल्यू.एच.हेमणे, सरपंच सुलक्ष्मी शामकुवर, उपसरपंच मनीराम हिंगे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मुकेश भगत यांनीही आग विझविण्यासाठी सहकार्य केले.