शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शिवेनची आत्महत्या नाहीच

By admin | Updated: March 3, 2017 01:21 IST

चार दिवसांपूर्वी रेल्वेच्या ट्रॅकवर मृतदेह आढळलेल्या शिवेन बिसेन या दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या नसून

पोलीस कारवाई संशयास्पद : चौकशीची पालक व पोवार समाजाची मागणीगोंदिया : चार दिवसांपूर्वी रेल्वेच्या ट्रॅकवर मृतदेह आढळलेल्या शिवेन बिसेन या दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या नसून घातपातच झाला असण्याची शक्यता शिवेनच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. आमचा मुलगा गेला, मात्र अशी घटना अन्य कुणासोबतही घडू नये यासाठी पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मृत शिवेन बिसेनचे वडील अनिल बिसेन यांनी केली आहे.येथील शासकीय विश्रामगृहात गुरूवारी (दि.२) पत्रकारांसोबत ते बोलत होते. याप्रसंगी पोवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष डॉ. कैलाश हरिणखेडे, प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण, पोवार समाजाचे कार्यकर्ते दुर्गेश रहांगडाले, शिवेनची आई शालिनी बिसेन यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते. पुढे बोलताना अनिल व शालीनी बिसेन यांनी सांगितले, मुलांच्या अभ्यासासाठी आम्ही गोंदियात राहतो. घरी पैशांची तंगी किंवा अन्य चिंता शिवेनला नव्हती. शिवेन अभ्यासात हुशार होता व त्याला नेव्हीत जाण्याची इच्छा होती. तो शाळेत व ट्यूशनला जात होता व त्याला कोणत्याच प्रकारचे टेंशन नव्हते. अशात त्याने आत्महत्या करणे शक्य नसल्याचे सांगीतले. दुर्गेश रहांगडाले यांनी, शिवेनच्या प्रकरणात आत्महत्या सांगहीतली जात असून त्याचे परिवार व सामाजाकडून खंडन केले. तर पोलिसांनी प्रकरणात योग्य ती कारवाई केली नाही. पोलिसांची कारवाई संतोषजनक नसल्याचाही आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे शिवेनचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला असताना त्यांचे मुंडके व शरीर जवळच होते. शिवाय शरीरावर कोणत्याही खुणा नव्हत्या व पायात स्लीपर घातलेली होती. रेल्वेने चिरडल्यानंतर अशा स्थितीत मृतदेह मिळने ही बाब संशयास्पद असल्याचेही त्यांनी सांगीतले. विशेष म्हणजे, शिवेनचा मृत्यू झाला असताना फेसबूकवर कुणीतरी ‘ठेंग्यांचे’ चिन्ह टाकत असल्याची माहितीही याप्रसंगी पत्रकारांना देण्यात आली. शिवाय प्रकरण गंभीर असताना या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षकांकडून नव्हे तर बीट जमादाराकडून केला जात असल्याचेही समाजबांधवांनी यावेळी पत्रकारांना सांगीतले. करिता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी यावेळी मृत शिवेनचे आई-वडील व समाजबांधवांनी केली. (शहर प्रतिनिधी)पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन शिवेन आत्महत्या करणार नाही व मृतदेहाची स्थिती बघताही ही बाब स्पष्ट होत असल्याने मृत शिवेनच्या आई-वडीलांनी पोवार समाजाकडे धाव घेतली. यावेळी समाज त्यांच्या सोबतीला आला व शिवेनच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पोवार प्रगतीशील मंचने उचलून धरली. यासाठी पोवार समाजाकडून बुधवारी (दि.१) पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.