शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेंड्यात परवान्याची दारू बंद, अवैध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 01:37 IST

आठ वर्षापासून सुरू असलेली देशी दारूची दुकान अचानक बंद झाल्याने गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

शेंडा (कोयलारी) : आठ वर्षापासून सुरू असलेली देशी दारूची दुकान अचानक बंद झाल्याने गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. चौकाचौकात व गल्लीबोळात अवैध दारुचा महापूर वाहत आहे. विक्रेत्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेंडा येथे सन २००८ मध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व काही लोकांच्या सहकार्याने चौकाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवार भिंतीला लागून देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आली होती. या दारू दुकानाच्या काही अंतरावर जि.प. शाळा आहे. सतत आठ वर्षांपासून अविरत चालू असलेली दारू दुकान परवाधारक आणि नोकरनामा असलेल्या व्यक्तीच्या वादात ही दुकान १ एप्रिलपासून बंद पडली. याचाच फायदा घेत कमी वेळात अधिक नफा कमावण्याच्या नादात अवैध दारू विक्रेत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.न्यायालयाने. २७ मे रोजी व्ही. साठे यांचे न्यायालयाने परवाना धारकाच्या बाजूने न्याय दिला. परंतु नोकरनामा असलेल्या व्यक्तीने २८ मे च्या रात्रीच जेसीबी ने दारू दुकानाचे घर पाडले. परवाना धारकाने दारू दुकानासाठी दुसरे घर शोधले. तेथे सुद्धा दारू दुकानाला मंजुरी मिळू नये म्हणून दोन चार लोकांना हाताशी धरुन देवरी, आमगाव व गोंदियाच्या वारंवार वाऱ्या करण्यात आल्या. स्वत: समोर न होता दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवणे सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली. गावातील पाणी वाहणाऱ्या नाल्या पालापाचोळ्याने भरल्या आहेत. कचरा पेट्या अनेक वर्षापासून तुडुंब भरल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. पथ दिव्याची समस्या आहे. गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुल मिळाले नाही. वृद्धांना नियमित पेंशन मिळते किंवा नाही, बीपीएल, अंत्योदय, एपीएलधारकांना रेशन मिळते किंवा नाही. जीवनावश्यक व मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करुन शेंड्यात दारूसाठी भांडणे होत आहेत. (वार्ताहर)