शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीसाठी ग्रामीण भागात पत्रक वाटप

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने घातलेल्या थैमानाचा धसका घेत पालिका प्रशासनच काय तर ग्राम पंचायत प्रशासनही कामावर लागले आहे.

गोंदिया : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने घातलेल्या थैमानाचा धसका घेत पालिका प्रशासनच काय तर ग्राम पंचायत प्रशासनही कामावर लागले आहे. पालिकेने या डासजन्य आजारांच्या जनजागृतीसाठी होर्डिंगबाजीवर भर दिला. तर ग्रामीण भागात मात्र पत्रकं वाटपाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. जवळील ग्राम भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने अंतर्गत येणाऱ्या गावांत पत्रक वाटल्याची माहिती आहे. डेंग्यू व मलेरियाने यंदा चांगलेच थैमान घातले आहे. ग्रामीण भागात याचा जोर जास्त वाटू लागला होता. मात्र शहरातही डेंग्यूचे रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ माजली. डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप एवढा वाढला की दिल्लीची चमू जिल्ह्यात येऊन गेली. डासजन्य या आजारांवर आळा घालण्यासाठी डासांची उत्पत्ती रोखणे हाच एक उपाय आहे. याशिवाय स्वत:च्या संरक्षणासाठी उपाययोजना करून या आजारांपासून बचाव करता येतो. डासांची उत्पत्ती रोखता यावी यासाठी फवारणी करण्याची गरज असते. ग्रामीण भागात हिवताप विभाग यासाठी जबाबदार असतो. तर शहरात मात्र नगर पालिकेकडून हे कार्य केले जाते. शहरात पालिका प्रशासन अयशस्वी ठरल्याने त्यांच्याकडून या आजारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशातून होर्डींग्स लावण्यात आले. पालिकेच्या या आगळ््यावेगळ््या प्रयोगावर तशा प्रतिक्रियाही शहरवासीयांकडून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र त्याच धर्तीवर आता ग्रामीण भागातही जनजागृतीचे कार्य केले जात आहे. ग्रामीण भागात मात्र यात थोडे अंतर आहे. त्याचे असे की, पालिकेचा कारभार मोठा असल्याने त्यांनी होर्डींग्स लावले. तर ग्राम पंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार त्या तुलनेत लहान असल्याने हे पत्रकं वाटून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. जवळील ग्राम भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानेही हा प्रयोग केल्याचे दिसून आले आहे. केंद्राकडून केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील गावकऱ्यांना डेंग्यू व मलेरियाची माहिती, बचावाचे उपाय, घ्यावयाची काळजी आदी माहिती असलेले पत्रकं वाटण्यात आले आहेत. आपली जबाबदारी पार पाडत सर्वच आपापल्या परीने धडपड करीत आहेत. मात्र जबाबदार विभाग व यंत्रणेकडून पाहिजे ते ठोस पाऊल उचलण्यात येत असल्याने सर्व काही नागरिकांनीच करावे काय असा सवाल उठत आहे. यावरून जिल्हा, शहर व ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मात्र प्रश्नचिन्ह उठतो. (शहर प्रतिनिधी)