शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

शंकरपटाला पुनरूज्जीवन मिळणार

By admin | Updated: January 10, 2016 01:56 IST

जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांमध्ये वर्षानुवर्षापासून चालत आलेली शंकरपटांची (बैलगाड्यांची शर्यत) ...

बंदी उठविण्याचे स्वागत : जिल्ह्यात अनेक वर्षांपासूनची परंपरा पुन्हा जपण्याची संधीसडक-अर्जुनी/अर्जुनी मोरगाव : जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांमध्ये वर्षानुवर्षापासून चालत आलेली शंकरपटांची (बैलगाड्यांची शर्यत) परंपरा पटावरील बंदीनंतर खंडित झाली होती. मात्र शुक्रवारी या पटांवरील बंदी न्यायालयाने सशर्त उठविल्याने या निर्णयाचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत आहे. विशेषत: सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यात शंकरपटाच्या शौकिनांनी पुन्हा नवीन उत्साहाने शंकरपटांचे आयोजन करण्याचा मनोदयही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.शंकरपटांच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यात मोठी उलाढाल होत होती. काही गावांमध्ये तर लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जात होती. सडक अर्जुनी तालुक्यातील सडक अर्जुनी, सौंदड, वडेगाव, डव्वा, पांढरी, खोडशिवनी येथील शंकरपट विशेष प्रसिद्ध होते. याशिवाय अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोरगाव, देऊळगाव, बोदरा, खांबी, चाप्टी, चान्ना, सावरटोला, अरततोंडी, ब्राह्मणटोला, सुकळी, पिंपळगाव या गावांमध्ये शंकरपटाची परंपरा होती. ती आता पुनरूज्जिवित होऊ शकते. शासनाने काही अटीच्या आधारे शंकरपटाला दिलेल्या परवानगीमुळे शंकरपट शौकीनामध्ये फारच उत्साह संचारला आहे. पटावर बंदी घातल्यानंतर पटाचे शौकीन निरउत्साही झाले होते. त्यांची बैलांकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती. चांगले बैल कमी किमतीमध्ये विकण्यातही आले होते. बंदी उठविण्याच्या बातमीमुळे शंकरपट समित्या पुन्हा सक्रीय झाल्या. शंकरपट हा ग्रामीण भागात परंपरागत असणारा बैलगाडीचा खेळ आहे. या शंकरपटासाठी बैलांची चांगली दाखल घेतली जाते. त्यांना चांगले खाऊ घालणे, खाण्यामध्ये ढेप, दूध, हिरवा चारा असे पौष्टीक पदार्थ देवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु शंकरपट बंद असल्यामुळे चांगल्या दर्जाचे बैल सुद्धा पहायला मिळत नव्हते. शंकरपटाला काही अटींवर मिळालेल्या परवानगीमुळे बैलांची विक्री बंद होऊन त्यांनाही चांगले दिवस पहायला मिळणार आहेत. शंकरपटामुळे सडक अर्जुनी तालुक्यात लाखोंची उलाढाल होणार आहे. सडक अर्जुनीत होणारा शंकरपट फार मोठा असून छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यातील बैलजोड्या येथे येत होत्या. महाराष्ट्रातील अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यातील पटशौकीन आपल्या बैलजोड्यासह येथे येत होते. लाखोंच्या बक्षिसांसोबत पट पहायला येणाऱ्या नागरिकांकडून हजारोंच्या शर्यती लावल्या जात. शंकरपटामुळे गावात जत्रेचे रुप बघायला मिळत होते. गेल्या काही वर्षात हे चित्र बदलले असले तरी आता पुन्हा ते चित्र दिसण्याची आशा सर्वांना लागली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातही काही गावे शंकरपटासाठी प्रसिद्ध होती. मकरसंक्रात आटोपल्यानंतर शंकरपटाला सुरुवात होते. गावातील प्रतिष्ठीत पाटलाच्या नावाने शंकरपट ओळखले जायचे. प्रत्येक खेळात जसे प्रसिद्ध खेळाडू असतात तसेच बैलांनाही विशेष नावे दिली जात होती. अशा बैलजोडींच्या किमतीसुद्धा भरपूर असायच्या. बैलांना थकवा येऊ नये यासाठी या बैलांना चारचाकी वाहनाने आणण्याची परंपरा अलिकडच्या काळात सुरू झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून शंकरपटावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे या उत्साहावर विरजण पडले होते. मात्र आता बंदी उठविण्यात आल्यामुळे ग्रामीण जनतेतील आनंद द्विगुणीत झाला आहे. मोठ्या शंकरपटांसह छोट्या प्रमाणात काही गावांमध्ये शंकरपट भरविले जाणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)करमणुकीसह लाखोंची बक्षिसे व पैजग्रामीण भागात शंकरपटाची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. रबी पीक निघाल्यानंतर थोडे ‘रिलॅक्स’ होण्यासाठी शेतकरी व शंकरपटप्रेमी आपल्या गावात पटांचे आयोजन करीत असत. यादरम्यान शेतकऱ्यांजवळ पीक विक्रीतून मुबकल पैसा यायचा. शंकरपटात बैलाच्या वेगवान गतीवर पैज लागायची. यात लाखो रुपयांची उलाढाल व्हायची. धावणाऱ्या बैलांना धष्टपुष्ट करण्यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत घेत असत. विवाह जोडप्याचे शंकरपट हे उत्तम माध्यम होते. ग्रामीण भागातील मंडईला जोडून या ठेवल्या जाणाऱ्या या शंकरपटात उपवर वर-वधूंची आवर्जुन उपस्थिती असायची. लग्न जोडण्याच्या आधीचा हा काळ असल्याने शंकरपटाला विशेष महत्व होते. येथूनच विवाह जुळायचे.शंकरपट म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना जोडणारा कणा आहे. पहिल्या दिवशी शंकरपट, रात्रीला झाडीपट्टीतील नाटक आणि दुसऱ्या दिवशी यानिमित्ताने आलेल्या पाहुण्यांचा पाहुणकार व त्यातूनच होणाऱ्या लग्नाच्या गोष्टी हे वातावरण अलिकडे लोप पावत होते. पण पटावरील बंदी उठविल्यामुळे पुन्हा ही परंपरा पुनरूज्जिवित होईल, अशी आशा आहे.- अशोक लंजेमाजी कृषी सभापती, जि.प.गोंदिया