शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांना रोजगाराच्या संधी दाखविणारा स्वत:च बेरोजगार

By admin | Updated: June 16, 2016 02:22 IST

तिरोडा येथील बेरोजगारांना मार्गदर्शन व शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा अरूण उपाशे यांच्या छोटेखानी दुकानावर नगर परिषदेने अतिक्रमण करून जमीनदोस्त केले.

अतिक्रमणाचा विळखा : १० वर्षांपूर्वी घर अन् आता दुकानही जमीनदोस्तगोंदिया : तिरोडा येथील बेरोजगारांना मार्गदर्शन व शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा अरूण उपाशे यांच्या छोटेखानी दुकानावर नगर परिषदेने अतिक्रमण करून जमीनदोस्त केले. त्यामुळे दुसऱ्यांना रोजगाराच्या संधी दाखविणारा स्वत:च आता बेरोजगार झाला आहे. तिरोडा येथील महात्मा फुले वार्डातील रहिवासी अरूण रामचंद्र उपाशे यांनी एम.ए.बी.एड.पर्यंत उच्च शिक्षण घेतले. मात्र रोजगार मिळत नसल्याने त्यांनी तिरोडा पोलीस ठाण्याजवळ सन २००५ मध्ये सांई रोजगार समाचार नावाचे छोटेखानी दुकान टाकले. त्यात ते तिरोडा तालुक्यातील बेरोजगारांना सर्वप्रकारचे नोकरीविषयक मार्गदर्शन करीत होते. त्यांच्यामुळे प्रथमच तिरोड्यातील बेरोजगारांना रोजगार साप्ताहिक, मासिक पत्रिका व इतर स्पर्धाविषयक पुस्तके उपलब्ध होवू लागली. तसेच सर्वच प्रकारचे आॅनलाईन फॉर्म, पोलीस भरती, सीआरपीएफ, बीएसएफ, सैन्य भरती, एमपीएससी, यूपीएससी, एनडीए व इतर फार्म स्वस्त दरात भरून देतात व बेरोजगारांना मार्गदर्शन करतात. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा शहर व ग्रामीण भागातील असंख्य बेरोजगारांना शासकीय नोकरी मिळालेली आहे. मात्र त्यांचा छोटेखानी व्यवसाय सुरळीत चालला असतानाच आता अतिक्रमणाचे ग्रहण लागले.तिरोडा नगर परिषदेने १५ जून २०१६ रोजी अतिक्रमणाची कारवाई करून त्यांची छोटेखानी दुकान जमीनदोस्त केली. अशा परिस्थितीत अरूण यांना आता दुसरा पर्याय उरला नाही. त्यांचे वडील सैनिक सेवेतून सेवानिवृत्त होवून स्वर्गवासी झाले. आईचेसुद्धा निधन झाले. अशा परिस्थितीत तो स्वत: आता अनाथ झाला आहे. यापूर्वी सन २००६ मध्ये तिरोडा बस स्थानकाजवळील त्यांचे राहते घर न्यायालयाने जमीनदोस्त करून ताब्यात घेतले होते. अशाप्रकारे त्यांच्यावर सतत अन्याय होत आहे. त्यांनी आपल्या छोटेखानी दुकानासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी न्यायाची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन केली आहे.