शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

सखींच्या कलागुणांची चुणूक

By admin | Updated: August 27, 2015 02:07 IST

लोकमत सखी मंच व जेसीआय कृती यांच्या संयुक्त विद्यमाने कटंगी येथे झालेल्या दोन दिवशीय २२ व २३ आॅगस्ट रोजी श्रावण मेळाव्यात महिलांनी मोठी गर्दी केली.

गोंदिया : लोकमत सखी मंच व जेसीआय कृती यांच्या संयुक्त विद्यमाने कटंगी येथे झालेल्या दोन दिवशीय २२ व २३ आॅगस्ट रोजी श्रावण मेळाव्यात महिलांनी मोठी गर्दी केली. त्यात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.२२ आॅगस्ट रोजी कटंगी येथील मयूर लॉनमध्ये श्रावण मेळाव्याचे शुभारंभ एकता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, कार्तिक चव्हाण, खुशबू टेंभरे, जेसीस अध्यक्ष भूमी बतवानी उपस्थित होते. सदर मेळाव्यात कपडे, महिला आयटम, खेळणे, गेम्स, पापड, आचार याशिवाय टीव्हीएस स्कूटीद्वारे स्टॉल्स लावण्यात आले होते. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शिवलिंगाची सजावट करण्यात आली. वधू स्पर्धा व छत्री सजावट स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे निर्णायक म्हणून गर्ल्स महाविद्यालयातील होम एक्नॉमिक्सचे प्रमुख गोकुला ढोके, आज इन्स्टिट्युटच्या संचालिका मंजू कटरे, अनुराधा ब्युटीपार्लरच्या संचालिका अर्चना देशमुख यांनी कामकाज सांभाळले. सर्व निर्णायकांनी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांची वाहवा केली. संचालन नंदा राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी चंद्रकला, पूजा चव्हाण, प्रीती शर्मा, कल्पना शर्मा, गुंजन बतवानी आदींनी सहकार्य केले.दुसऱ्या दिवशी २३ आॅगस्टला दीपा भौमिक यांच्या अध्यक्षतेखाली श्रावण मेळाव्याची सांगता करण्यात आली. याप्रसंगी अतिथी म्हणून अखिलेश सेठ, प्रसन्नजित संधू (कोरियोग्राफर), जेसीआयचे पुरूषोत्तम मोदी उपस्थित होते. महिलांच्या विविध स्पर्धाही झाल्या. स्पर्धा निर्णायक म्हणून गर्ल्स कॉलेजच्या गोकुला ढोके, मंजू कटरे, अर्चना देशमुख यांनी कामकाज सांभाळले. संचालन सानिया खान यांनी केले. कार्यक्रमासाठी चंद्रकला, पूजा चव्हाण, प्रीती शर्मा, कल्पना शर्मा, गुंजन बतवानी आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)