शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

४६० विषय शिक्षकांची निवड

By admin | Updated: June 1, 2016 02:25 IST

जि.प. शाळांमध्ये विषय शिक्षक देण्यासाठी २३ व २४ मे रोजी जि.प.च्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

शिक्षक पदस्थापना : ३०० शिक्षकांच्या ३ जून रोजी सर्वसाधारण बदल्यागोंदिया : जि.प. शाळांमध्ये विषय शिक्षक देण्यासाठी २३ व २४ मे रोजी जि.प.च्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सेवाज्येष्ठतेनुसार असलेल्या १०२३ शिक्षकांना बोलावण्यात आले होते. त्यातील ४६० शिक्षकांची विषय शिक्षक म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना संबधित शाळांत नियुक्ती देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत अनेक शाळांमध्ये अनेक विषयांचे शिक्षक नव्हते. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक होते. मागील पाच वर्षापासून एकीकडे विषय शिक्षक नाही ही ओरड तर दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक मोठ्या प्रमाणात असल्याची ओरड होती. त्यामुळे ज्या-ज्या शाळेत विषयांचे शिक्षक रिक्त आहेत, त्या-त्या शाळेत संबंधित विषयाच्या डीएड्, बीएड् व पदवीधर शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले. गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात ४९० अतिरिक्त शिक्षक होते. त्यापैकी ४६० शिक्षकांचे विषय शिक्षक म्हणून समायोजन करण्यात आले. तरी देखील ३० शिक्षक आजही अतिरिक्त आहेत. २६ व २७ मे रोजी तालुकास्तरावर समायोजन करण्यात आले. २८ तारखेला ३३ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन करण्यात आले. गोंदिया जिल्हा परिषेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी शिक्षकांना पाठविण्यात आले. संच मान्यतेमुळे हे शिक्षक अडचणीत येणार होते. परंतु आता विषय शिक्षक म्हणून समायोजन झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा या शिक्षकांना वेतनाची समस्या पुढे भेडसावली असती. गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत ९५ टक्के शिक्षकांच्या समस्या या समायोजनामुळे संपल्या. ५ टक्के समस्या दिवाळीपर्यंत संपणार आहेत.मागील पाच वर्षात शिक्षकांची बदली नाही, समायोजन नाही, रिक्त पदांची भरती नाही, त्यामुळे कामात मोठ्या अडचणी येत होत्या. परंतु आता जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांच्या पुढाकाराने व मुकाअ डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ही कार्यवाही पूर्ण केली. (तालुका प्रतिनिधी)