शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

शाळेत शिक्षकांची वानवा

By admin | Updated: March 24, 2017 01:41 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून

शिक्षणाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष : खैरलांजी येथील विद्यार्थ्यांचे नुकसानपरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून या शाळेत शिक्षकांची उणीव असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व गावकऱ्यांकडून केली जात आहे.शाळेतील सौंदर्यीकरणाची भिंत पडल्याने एक मुलगा जागीच मृत्यू झाला होता व त्याचीच बहीण जखमी झाली होती. प्रकरण मोठे तापले होते व तीन शिक्षकांवर प्रशासनाने ठपका ठेवून निलंबित केले होते. पण त्या ठिकाणी शिक्षक दिलेच नाही. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन शिक्षकांवर विशेष भर देत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार १४ वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. यासाठी जिल्ह्यात ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा अभिनव उपक्रम मागील चार वर्षापासून राबविण्यात आला. तर शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र हा उपक्रम राज्यभर सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘डीजीटल शाळा’ यावर विशेष भर दिला जात आहे. लोकसहभागातून जि.प.ची प्रत्येक शाळा डिजीटल केली जात आहे. मात्र जि.प. शाळेत शिक्षकांची उणीव राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येते. खैरलांजी येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ७ पर्यंत वर्ग असून या शाळेत दोनच शिक्षक कार्यरत आहेत. प्रतिनियुक्तीवर चांदोरी खुर्द शाळेतील एक शिक्षक असे तीन शिक्षक अध्यापन कार्य करीत आहे. मुख्याध्यापकाला कार्यालयीन कामच सांभाळावे लागते. पोषण आहार याशिवाय एखादा शिक्षक अनुपस्थित असल्यास दोन शिक्षकांना ७ वर्ग सांभाळने शक्य नाही. यामुळे शिक्षक कार्यप्रणालीवर जि.प.च्या शिक्षण विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो व खासगी शाळेकडे धाव घेतात. फक्त कागदावर व अधिकाऱ्यांचा उदोउदोच दिसते. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता आहे का, पुरस्कार प्रदान करणे, घेणे-देणे एवढ्या पूरताच शिक्षण विभाग राहीला आहे. शाळेतील २८ विद्यार्थ्यांनी खासगी व दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी टी.सी. मागणीचे अर्ज मुख्याध्यापकांकडे दिले . (वार्ताहर)