शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी सहकारी संस्थेत घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2016 02:14 IST

गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त घोटाळे करणाऱ्या तालुक्यामध्ये सडक-अर्जुनीचे नाव अग्रक्रमावर आले आहे.

सडक-अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त घोटाळे करणाऱ्या तालुक्यामध्ये सडक-अर्जुनीचे नाव अग्रक्रमावर आले आहे. तहसील कार्यालयाचा आर.डी.घोटाळा गाजल्यानंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी घोटाळ्यांची मालिकाच सुरू केली आहे. पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा तपास व सुनावणीत व्यस्त असताना आता आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या ६ लाख १९ हजार १९ रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था सडक-अर्जुनी र.नं. १३३२ या संस्थेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सडक-अर्जुनी येथे खाते आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीराम चमरूजी भोयर तर सचिव म्हणून मंगेश भारत मेश्राम यांनी धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आलेल्या बोनस निधीची परस्पर विल्हेवाट लावून शेतकऱ्यांच्या धानाचा बोनस लाटल्याचा आरोप केला जात आहे. ज्यांना या सहकारी संस्थेचे काहीच घेणे-देणे नाही अशा व्यक्तींच्या नावाने चेक देऊन अवैधरित्या रकमेची उचल करण्यात आली. यात श्रीराम भोयर यांच्या नावे २६ फेब्रुवारी २०१४ ला ९२ हजार ३६० रुपये, विशाल भोयर यांच्या नावे १७ जानेवारी १५ ला २० हजार रुपये, १८ फेब्रुवारीला १५ हजार, २ मार्च १५ ला ९ हजार ४४७ रुपये, १५ एप्रिल ७ हजार रुपये, २५ एप्रिल १० हजार रुपये, ५ मे १५ ला १५ हजार रुपये, ८ मे १५ ला १० हजार रुपये, २ जुलै १५ ला ६ हजार रुपये, गावतुरे यांच्या नावे २१ फेब्रुवारीला ३ हजार ३९४ रुपये, तेजुबाबू खोटेले यांच्या नावे ५ फेब्रुवारी २०१५ ला २ हजार १३२ रुपये, शरद बकाराम खोटेले यांच्या नावे २ मार्च १५ ला २७ हजार ९१५ रुपये, प्रमिला देवराम कापगते यांच्या नावे १ जून १६ ला ४७ हजार १२ रुपये, पवन देवराम कापगते यांच्या नावे २७ जुलै १५ ला ४६ हजार ५०० रुपये व ८ मार्च २०१५ ला १ लाख २७ हजार ५०० रुपये, खालीद अली आबीद अली सैय्यद यांच्या नावे १ लाख ३८ हजार ५०० रुपये, राजेश मांदाळे यांच्या नावे ३० हजार रुपये असे एकूण ६ लाख १९ हजार १९ रुपये नियमबाह्यरित्या बोगस सह्या करून को-आॅपरेटीव्ह बँक शाखा सडक-अर्जुनीअंतर्गत काढण्यात आले आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची बैठक घेऊन प्रभारी अध्यक्ष वासुदेव खेडकर यांचे स्वाक्षरीने श्रीराम भोयर, तत्कालीन अध्यक्ष सचिव मंगेश मेश्राम, तत्कालीन केंद्र प्रमुख विशाल भोयर यांची लिखीत तक्रार करून त्यांचेवर पोलीस स्टेशनअंतर्गत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलीस अधीक्षक भुजबळ यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे. शिक्षण विभागानंतरचा आदिवासी सोसायटीचा हा दुसरा घोटाळा कुठपर्यंत समोर जातो, किती जण यात आरोपी म्हणून पुढे येतील याची चर्चा सुरू आहे.कुणकुण लागताच अध्यक्षपद खेडकरांकडेज्यांच्या नावावर चेकद्वारे लाखो रुपयांचा निधी काढण्यात आला त्यांचा आदीवासी सहकारी संस्थेशी कुठलाही संबंध नाही. संस्थेचे अध्यक्ष श्रीराम भोयर यांचे चिरंजीव विशाल भोयर यांनी आपली वेगळीच शक्कल लढवून आणि बोगस सह्या करून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला लाखोंचा चुना लावण्याचे बोलले जात आहे. संस्थेच्या इतर सदस्यांना ही माहिती मिळताच माहिती अधिकारांअंतर्गत माहिती प्राप्त करून श्रीराम भोयर यांना अध्यक्षपदावर काढून वासुदेव खेडकर यांना अध्यक्षपदाचा पदभार देण्यात आला आहे.