शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा व सडक-अर्जुनीत बसस्थानक

By admin | Updated: March 30, 2017 00:57 IST

सालेकसा व सडक-अर्जुनी तालुका निर्मितीला ३० वर्षांचा काळ लोटत आहे, मात्र या दोन्ही तालुकास्थळी आतापर्यंत बसस्थानक उभारले नाहीत.

३० वर्षानंतर होणार प्रवाशांची सोय : प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयात, जागा मिळताच कामाला सुरूवात देवानंद शहारे  गोंदिया सालेकसा व सडक-अर्जुनी तालुका निर्मितीला ३० वर्षांचा काळ लोटत आहे, मात्र या दोन्ही तालुकास्थळी आतापर्यंत बसस्थानक उभारले नाहीत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस राज्य मार्गावरच थांबतात व पुढे निघून जातात. मात्र आता प्रवाशांचे हे हाल दूर होणार आहेत. जागेचा प्रश्न सुटताच सदर दोन्ही तालुकास्थळी बसस्थानकांची उभारणी होणार आहे. सडक-अर्जुनी व सालेकसा गावांना तालुका बनण्यास ३० वर्षांपेक्षा अधिक कालखंड लोटला. परंतु आतासुद्धा या दोन्ही तालुका मुख्यालयांना बसस्थानक मिळू शकले नाही. बसस्थानक बनविण्याचे प्रयत्न सदर दोन्ही ठिकाणी करण्यात आले. परंतु त्यात यश आले नाही. बसस्थानकांसाठी जागा उपलब्ध न होणे हीच या मार्गातील सर्वात मोठी समस्या बनली होती. मात्र आता सडक-अर्जुनी येथे नगर पंचायतच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे तेथे लवकरच बस स्थानकाची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपूर्वी सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या अध्यक्ष रीता अजय लांजेवार यांनी एक प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावात लांजेवार यांनी बस स्थानकासाठी आवश्यक जागा नगर पंचायतच्या वतीने उपलब्ध करवून देण्याची तयारी दाखविली. तसेच सालेकसा येथील एका युवकाने आपल्या मालकीची जागा बस स्थानकासाठी देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव तयार करून राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत. आता याबाबत निर्णय मुंबई कार्यालयाद्वारे घेण्यात येणार आहे. हा निर्णय कधी घेण्यात येईल याची आतुरता दोन्ही तालुक्यातील नागरिकांना लागली आहे. माहितीनुसार त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य परिवहन महामंडळ सकारात्मकच निर्णय घेईल, असे समजले जात आहे. जर असे झाले तर सडक-अर्जुनी व सालेकसा या दोन्ही ठिकाणी बस स्थानकांची सुविधा उपलब्ध होवू शकेल. यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दोन्ही तालुका मुख्यालयात बस स्थानक बनल्यास तेथील नागरिकांना मोठाच दिलासा मिळेल.