शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये मालाची खरेदी-विक्री बंदच

By admin | Updated: July 15, 2016 02:00 IST

राज्य शासनाने शेतकरी हितात निर्णय घेवून एक आदेश काढला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर अडत (दलाली) न घेता व्यापाऱ्यांकडून घेण्यात यावे

शासन निर्णयाला विरोध : व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा गोंदिया : राज्य शासनाने शेतकरी हितात निर्णय घेवून एक आदेश काढला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर अडत (दलाली) न घेता व्यापाऱ्यांकडून घेण्यात यावे, असे ठरले. मात्र या आदेशाच्या विरोधात गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी धान खरेदी बंद केली आहे. गुरूवारीसुद्धा खरेदी बंदच होती. या प्रकारामुळे धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे धान खरेदी होत नसल्यामुळे ते सुद्धा अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पन्नाच्या विक्रीवर अडत घेतली जात होती, हे स्पष्ट आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितात निर्णय घेवून ५ जुलै रोजी शासनादेश काढला. त्यात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत घेण्यात यावी, असे नमूद आहे. सदर आदेश १२ जुलै रोजी गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना मिळताच त्यांनी धान खरेदी बंद केली. त्यामुळे बुधवार व गुरूवार या दोन्ही दिवशी शेतकऱ्यांच्या धानाची विक्री होवू शकली नाही. या आदेशाने शेतकरी सुखावले आहेत तर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या प्रकाराबाब गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव सुरेश जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, व्यापाऱ्यांनी धान खरेदी पूर्णत: बंद केली आहे. आता त्यासाठी बाजार समितीमध्ये शुक्रवार (दि.१५) व्यापाऱ्यांसह बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीत व्यापारी काय निर्णय घेतात, त्यानंतर पुढील बाब स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)