शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अनाथ मुलीच्या लग्नाचा उचलला भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:21 IST

समाजामध्ये आजही सामाजिक बांधिलकी जपून अन्यायग्रस्त व अनाथांना भरभरुन मदत करुन त्यांच्या चिंतामय चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी त्यागाची भूमिका स्वीकारणाऱ्या महानुभाव दानदात्यांची कमी नाही.

ठळक मुद्देसामाजिक दानदात्यांचा पुढाकार : अन्नधान्यासह जीवनोपयोगी साहित्य भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : समाजामध्ये आजही सामाजिक बांधिलकी जपून अन्यायग्रस्त व अनाथांना भरभरुन मदत करुन त्यांच्या चिंतामय चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी त्यागाची भूमिका स्वीकारणाऱ्या महानुभाव दानदात्यांची कमी नाही. ग्राम मांडोखाल येथील एका अनाथ मुलीच्या लग्नासाठी मदतीच्या आवाहनावरून जिल्ह्यातून अनेक दानदात्यांनी त्या अनाथ मुलीच्या वैवाहिक सुखी जीवनासाठी पुढे येऊन भरभरुन मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यकर्ता प्रा. डॉ. सविता बेदरकर यांनी दानदात्यांच्या मदतीने त्या अनाथ मुलीच्या लग्नाचा भार उचलून आवश्यक ते साहित्य मुलीच्या घरपोच केले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ज्यांच्या जन्मदात्या मायबापांचे छत्र हिरावून अनाथ होऊन जवळच्या नातलगांच्या सहायाने जीवन जगत आहे. अशा २० अनाथ मुला-मुलींना अन्नधान्यासह ईतर साहित्य पुरविण्याचे काम ‘लोकमत’ प्रतिनिधी अमरचंद ठवरे व डॉ. बेदरकर यांच्या सहकार्याने नियमित सुरू आहे. ग्राम मांडोखाल येथील ज्योती घनशाम ठाकरे या अनाथ मुलीचा येत्या १७ एप्रिल रोजी विवाह होऊ घातला आहे. तिच्या लग्न कार्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून वृत्त प्रकाशित करुन वेळोवेळी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यावरून जिल्ह्यातील अनेक दानदात्यांनी भरभरुन प्रतिसाद देत सर्वोतोपरी मदत केली.ज्योतीच्या लग्न कार्यासाठी डॉ. बेदरकर यांनी गोंदिया येथील अनेक दानदात्यांकडून तांदूळ, गहू, दाळ, तेल, मिरची पावडर, मसाला, हळद, जेवणाचे साहित्य यासह नवरदेवाला कपडे व मुलीला साड्या इत्यादी वस्तू मांडोखाल येथे आणून दिल्या. गोंदिया येथील मंजुषा कार्लेकर, रामनगरचे ठाणेदार देशमुख, मनिषा नशिने, आरती चवारे, वैशाली कोहपरे, सुनंदा भुरे, श्रीखंडे, डॉ. भूषण मेश्राम, चोयराम गोपलानी, लटारे, राखी ठाकरे, विश्वदीप डोंगरे, मुन्ना यादव, भुजबळ, सुषमा देशमुख, प्रा. बागडे, अंजली सिरस्कर, शर्मिला पाल, निलीमा कुथे, शामकुवर, शालू तिरपुडे, योगा क्लब, नशिने, कल्याणी खोब्रागडे, मंदा गायधने, विठ्ठल भरणे, शोभना पटेल, दिनेश उके इत्यादींनी मदतीमध्ये सहभाग नोंदवला.ज्योतीला इंडेन गॅस कनेक्शन अशोक चांडक बंधू, गोदरेज कपाट एस.एस. जे. महाविद्यालयातील प्रा. डॉ. कल्पना सांगोडे, कुलर बाजीराव तुळशीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव नेवारे, बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष सोनदास गणवीर, बाजार समितीचे सचिव अशोक काळबांधे, सडक-अर्जुनी येथील शिक्षक अनिल मेश्राम, कठाणे यांनी जिवनोपयोगी साहित्य भेद दिले. येत्या १७ एप्रिल ला अनाथ ‘ज्योती’ वैवाहिक जिवनात पदार्पण करणार आहे. विवाहप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी प्रा. सविता बेदरकर तसेच गोंदियाचे समाजसेवी, प्रा. डॉ. कल्पना सांगोळे, सोनदास गणीवर, अनिल मेश्राम उपस्थित राहणार आहेत. ज्योतीच्या मदतीसाठी व तिचे वैवाहिक जीवन सुखी संपन्न जाण्यासाठी दानदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन ठवरे यांनी केले आहे.