शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा ‘आॅक्सिजनवर’

By admin | Updated: October 19, 2015 02:06 IST

दररोज १५० पेक्षा जास्त बाह्य रुग्णांची तपासणी व औषधोपचारादरम्यान केव्हाही प्रसुती आणि अपघातांचे रुग्ण येऊन धडकने.

निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त : ओपीडी अस्थायी डॉक्टराच्या भरवशावर, बेडवर स्वच्छतेचा अभावविजय मानकर सालेकसादररोज १५० पेक्षा जास्त बाह्य रुग्णांची तपासणी व औषधोपचारादरम्यान केव्हाही प्रसुती आणि अपघातांचे रुग्ण येऊन धडकने. अशात ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव असेल तर अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयात मिळणारी आरोग्य सेवा कशी असेल याची कल्पना आपण करु शकता. यामुळेच येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण सेवा ‘आॅक्सिजनवर’ असल्याचे चित्र प्रत्यक्ष पहावयास मिळत आहे.३२ वर्षापूर्वी सालेकसा तालुका अस्तित्वात आला असून त्यानंतर १० वर्षात सालेकसा येथील स्थानिक आणि तालुक्यातील गरीब जनतेला मोफत व उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला काही वर्ष ठिकठाक चालल्यानंतर येथे रिक्त पदांचे असे ग्रहण लागले की ते काही सुटले नाही. आज घडीला येथे निम्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिक्षकाचे एक पद मंजूर असून मागील १६ वर्षांपासून रिक्त होते. अपवाद म्हणूूून सन २०१३-१४ मध्ये काही महिन्यापर्यंत ते पद भरले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन पदांमधील एकच पद भरले असून डॉ. सुषमा नीतनवरे पदावर कार्यरत आहेत. वर्ग ३ अंतर्गत अधीपरिचारिकांची सात पदे मंजूर असून दोन पद अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. एक्सरे तंत्रज्ञाचे एक पद मंजूर असून ते सन २००९ पासून रिक्त आहे. या पदावरील कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर दुसरे तंत्रज्ञ आलेच नाही. एवढेच नाही तर सन २०१० पासून एक्सरे मशीन सुद्धा बंद पडून आहे. प्रयोगशाळा सहायकाचे एक पद मंजूर असून मागील वर्षापासून रिक्त आहे. या पदावर असलेले कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद भरण्यात आले नाही. वर्ग ४ अंतर्गत सात पद मंजूर असून त्यातील चार पद रिक्त आहेत. यात कक्ष सेवकांच्या चार पैकी तीन पद सन २०११ पासून रिक्त आहेत. सफाईगाराच्या दोन पैकी एक पद सन २०१० पासून रिक्त आहे. शिपाहीचे एक पद भरलेले आहे. कनिष्ठ लिपिकाचे तीन पद मंजूर असून एक पद भरलेले आहे. तर एक पद सहा महिन्यापासून आणि दुसरे चार वर्षापासून रिक्त आहे. एकंदरित निम्यापेक्षा जास्त पदे रिक्त असून आरोग्य सेवेवर थेट परिणाम होत आहे. येथे रुग्णांना दाखल करण्यासाठी एकूण ३० बेड ची व्यवस्था आहे. परंतु बेडची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर बहुतांश बेडला डाग लागलेले दिसून आले व असहनीय दुर्गंधी येत असते. त्यामुळे अनेक रुग्ण भर्ती होण्यास घाबरतात व वेळेवर औषधोपचार मिळत नाही. वैद्यकीय अधिकारी रुग्णांसोबत संवेदनहिनता दाखवतात, अशी तक्रार अनेक रुग्णांकडून येत असल्यामुळे येथे सामान्य रुग्ण सुद्धा जास्त येऊ पाहत नाही. महिन्यात सरासरी २० रुग्ण प्रसुतीचे, २५ अपघातांचे तसेच येथे दररोज १५० पेक्षा जास्त बाह्यरुग्ण औषधोपचार करण्यासाठी येतात. तसेच केव्हाही अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विष प्राशन करणारे रुग्ण सुद्धा येत असतात. मात्र या पैकी अनेकांना उपचार न करता गोंदिया रेफर करण्यात येते. याशिवाय क्षयरोग, मधुमेह, कृष्ठरोग इत्यादी गंभीर आजारांचे रुग्ण सुद्धा औषधोपचार घेतात. परंतु येथे नियमित वैद्यकीय अधिकारी आणि पुरेशे आरोग्य कर्मचारी नसल्याने हे ग्रामीण रुग्णालय शेवटच्या घटका मोजत आहे. तर इमारत शोभेची वास्तू बनून राहणार आहे.