शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाला अखेर दोन डॉक्टर मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 01:42 IST

स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करून अव्यवस्था दूर करण्याच्या मागणीकरिता नवेगावबांध ..

आंदोलनाचा धसका : प्रशासनाने घेतली दखलनवेगावबांध : स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करून अव्यवस्था दूर करण्याच्या मागणीकरिता नवेगावबांध येथील नागरिकांनी ताला ठोको आंदोलनाचा पवित्रा घेतला होेता. त्याचा धसका घेत आंदोलनकर्त्यांना शांत करून आरोग्य प्रशासनाने तातडीने दोन अधिकाऱ्यांची नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात बदली केली.या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला दि.२४ च्या सायंकाळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून आंदोलन संपविण्याची विनंती केली. परंतु १५ दिवसापूर्वी याच अधिकाऱ्यांच्या आश्वासनावर आंदोलन स्थगित केले असताना त्याची पूर्तता होत नसल्याचे सांगत आंदोलनकर्ते भूमिकेवर कायम राहिले. बुधवारला सकाळी ११ वाजता असंख्य आंदोलनकर्ते ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. उपस्थित पलिसांनी रुग्णालयाच्या गेटवरच त्यांना रोखून धरले. त्यांचा रोष लक्षात घेता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.वाघमारे हे आंदोलकांसमोर आले आणि त्यांच्या मागण्या रास्त असल्याची भावना व्यक्त करुन रुग्णालयाची बिघडलेली रुग्णसेवा पूर्वीसारखी सुरळीत होण्याकरिता दोन वैद्यकीय अधिकारी ताबडतोब या रुग्णालयासाठी देण्याचा निर्णय घेतला. देवरी येथील रुग्णालयाचे डॉ.राहूल बागडे यांना पुढील आदेशापर्यंत ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे रुजू केले व दुसरे डॉक्टर सायंकाळपर्यंत रुजू होतील, असे सांगितले. या दवाखान्याला आठवड्यातील दोन दिवस डोळ्यांचे डॉक्टर, तर रोज एक्सरे टक्नेशियन उपस्थित राहून सेवा देतील असे सांगितले. यापुढे या दवाखान्याची ओपीडी सकाळ-सायंकाळ सुरु राहील, शवविच्छेदनास विलंब होणार नाही, स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेतली जाईल व या रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ उपस्थित राहून उपचार केले जातील. सोबतच अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी अर्जुनी मोरगावचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, नवेगावबांधचे एपीआय राठोड, उपस्थित होते. आंदोलकांमध्ये विजय डोये, नवलकिशोर चांडक, सरपंच लिना डोंगरवार, विलास कापगते, दिलीप जैन, होमराज पुस्तोडे, पितांबर काशिवार, रितेश जायस्वाल, रामदास बोरकर, दिनेश खोब्रागडे, जितेंद्र कापगते, धनराज डोंगरवार, नरेश जायस्वाल, चंद्रभान टेंभुर्णे, संजय खरवडे, प्रकाश तरोणे, प्रविण गजापुरे, रेशिम काशिवार, अशोक हांडेकर, गुलाब करंजेकर, प्रकाश कुसराम, बाबुराव नेवारे, वसंत उजवने, योगेश पुस्तोडे, योगेश कापगते, अमृत कापगते, पंकज साखरे व गावातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)वृद्धाचा मृत्यूगोंदिया : सालेकसा तालुक्यातील रायपूर येथील राधेश्याम सखाराम डोमळे (५५) यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना साखरीटोला येथे बुधवारी (दि.२५) सकाळी ६ वाजता घडली.