शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही मैदानी खेळांचा पडतोय विसर

By admin | Updated: June 4, 2015 01:00 IST

अलिकडे बालकांसह युवकांमध्येही क्रिकेटशिवाय इतर मैदानी खेळांचे आकर्षण कमी होत आहे. संगणकीय गेम किंवा मोबाईलवर खेळण्यातच युवा वर्गाचा वेळ जात आहे.

गोंदिया : अलिकडे बालकांसह युवकांमध्येही क्रिकेटशिवाय इतर मैदानी खेळांचे आकर्षण कमी होत आहे. संगणकीय गेम किंवा मोबाईलवर खेळण्यातच युवा वर्गाचा वेळ जात आहे. हीच परिस्थिती कमीअधिक प्रमाणात आता ग्रामीण भागातही येऊ लागली आहे. आधी सुट्या लागल्या आणि उन्हाळा सुरू झाला की बालकांची पावलं मैदानी खेळांकडे वळायची. त्यात कबड्डी, गिल्ली-दांडू, आट्यापाट्या या खेळांना विशेष महत्व असायचे. पण बदलत्या युगाचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवत आहे. पूर्र्वी या भागात खेळल्या जाणाऱ्या खेळावरही व्हिडीओ गेम आणि टीव्हीने ताबा मिळवला आहे. त्यामुळे मैदानी खेळ आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मैदानी खेळ म्हणून आता केवळ क्रिकेट तेवढा शिल्लक दिसत आहे. वास्तविक बालकांच्या शारीरिक विकासासाठी मैदानी खेळ गरजेचे असतात. १५ ते २० वर्षापूर्वी लगोरी खेळाची क्रेझ होती. खापरड त्याकामी उपयोगात येणाऱ्या कवळया, गोट्यांची जागा आता बुध्दीबळातील गोट्यांच्या सापशिडींनी व ल्युडो नावाच्या विदेशी खेळाने घेतली आहे. सडी किंवा आबाहुबी आता कुणी खेळत नाही. असे झाडही आता उपलब्ध नाहीत. कुची खेळताना मार, जखमांचा विचार तेव्हाची बालके करीत नव्हती. त्रिकोण ९ गोटे, २१ गोटे तर दिसतच नाही. आळा फोडणीचा काठ्यांचा खेळ कित्येक वर्षापूर्वीच बंद झाला. घरात बसून खराट्याच्या काड्यांचा खेळही आता होत नाही. तळयात, नदी की पाळ, माचीसच्या काडीपेडीचे पत्ते आता कुणी गोळा करीत नाही. गोलातून बॉटल्सचे झाकण कवेलूने काढले जात नाहीत. बंद भरणी, डबल का सिगल आता कुणाला आठवतही नसेल. चिंचोटे, सीताफळाच्या बिया लपविणे, बाहुले गाडगे, मांडव तयार करणे, भातुकली, सासू सासऱ्याचा खेळ आत कालबाह्य झालेत. कंच्याचे खेळ टोच पाच, राजा-राणी, बेंडावा गोळी, टिब्बू, लंगडी थोड्याफार प्रमाणात मुली खेळतात. इंकी पिंगी व्हाट कलर? रेस टिप, विष अमृता खेळही आता खेळला जात नाही. टायरचे चक्के आता रस्त्यांनी फिरविले जात नाहीत. भोवरे कधी-कधी खेळले जातात. गिल्ली दांडू सुध्दा खेळण्याचे प्रमाण कमी आहे. (प्रतिनिधी)