शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

रूबेला लसीकरण शिबिर परवानगीविनाच

By admin | Updated: September 8, 2014 00:35 IST

शनिवारी (दि.६) शहरातील सिव्हील लाईन परिसरातील डॉ. चंपा सलाम यांच्या खासगी रूग्णालयात भंडाऱ्याच्या एका स्वयंसेवी संस्थेने रूबेला लसीकरण शिबीर आयोजित केले.

गोंदिया : शनिवारी (दि.६) शहरातील सिव्हील लाईन परिसरातील डॉ. चंपा सलाम यांच्या खासगी रूग्णालयात भंडाऱ्याच्या एका स्वयंसेवी संस्थेने रूबेला लसीकरण शिबीर आयोजित केले. सदर शिबिरात १६० युवतींना रूबेलाच्या लसी लावण्यात आल्या. हे शिबिर आरोग्य विभागाच्या परवानगीविनाच घेण्यात आले व महागडी लस अत्यल्प दरात उपलब्ध करवून दिल्याने शहरात तर्कवितर्क लावले जात आहेत.केवळ १०० रूपयांत रूबेलाची लस उपलब्ध करवून देण्याबाबत शहराच्या काही भागात घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला. नाव नोंदविण्याच्या नावावर त्यांच्याकडून २०-२० रूपये वसूल करण्यात आले. अशाप्रकारे अनेक युवतींकडून भंडाऱ्याच्या विमलानंद बहुउद्देशिय शिक्षण संस्थेशी जुळलेल्या लोकांनी रूपये वसूल केले. ज्यांनी लस लावली त्यांच्याकडून १००-१०० रूपये वसूल करण्यात आले. या शिबिरात किती युवतींनी लसीकरण करून घेतले, याबाबत काहीही सांगण्यास राहुल माकोडे नामक कर्मचाऱ्याने नकार दिला. मात्र ज्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्यांच्यानुसार १६० युवतींना सदर लस लावण्यात आली. विशेष म्हणजे बाजारात रूबेलाची लस ३०० ते ४०० रूपयांपर्यंत उपलब्ध असते. ही लस महागडी असल्याने औषध विक्रेतेसुद्धा तिला विक्रीसाठी ठेवण्यास इच्छुक नाहीत. मग ज्या संस्थेचे लोक केवळ १०० रूपयात उपलब्ध करून देतात ते ही लस कोठून आणतात, हा प्रश्न उद्भवतो. कोणतेही आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. सदर शिबिर गोंदिया शहरात असल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी घेणे आवश्यक होते. चौकशी केल्यावर अस्थायी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप्रिया झॉ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल व डॉ. विनोद वाघमारे यांनी सदर शिबिर घेण्याबाबत कसलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर शिबिर परवानगीविनाच आयोजित करण्यात आल्याचे सिद्ध होते. (प्रतिनिधी)