शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

८५ हजार कुटुंबांना रोहयोचा आधार

By admin | Updated: February 20, 2016 02:33 IST

पावसाने पाठ फिरविल्याने शेतात कामे नाहीत. रबी हंगामासाठी पाण्याची सोय नाही. त्यामुळे मजुरांच्या हातांना शेतीचे काम नाही.

गोंदिया: पावसाने पाठ फिरविल्याने शेतात कामे नाहीत. रबी हंगामासाठी पाण्याची सोय नाही. त्यामुळे मजुरांच्या हातांना शेतीचे काम नाही. अशा परिस्थितीत महात्मा गांधी रोजगार हमी योजना ग्रामीण भागातील मजुरांसाठी मोठा आधारवड ठरली. कामाच्या शोधात इतर भागात भटकंतीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांना आपल्याच गावाजवळ काम उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेमुळे जिल्ह्यात ८५ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले.एरवी गावाकडे कामे नसली की गावातील मजूर गाव सोडून शहरामध्ये येतात. अशावेळी त्यांना गाव व परिसरात रोजगार उपलब्ध करु न देवून मजूरांचे स्थलांतर थांबविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश साध्य करीत असताना गावांमध्ये मजुरांना काम व रोजगार उपलब्ध होत आहे. पर्यायाने गावाचा विकासही साधला जात आहे. ही योजना ग्रामीण विकासाची व रोजगार निर्मिती करण्यासाठी आधारवड ठरली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही मजुरांना रोजगाराची हमी तर देतेच तसेच गावात पायाभूत सुविधांचा विकासही करण्यात महत्वाची ठरत आहे. योजनेतून झालेल्या कामांमुळे गाव स्वयंपूर्ण व स्वावलंबी होण्यास मदत होत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १७ फेब्रुवारी २०१६ पर्यंत एकूण ९३ कोटी ६९ लाख ३४ हजार रु पये निधी खर्च करण्यात आला आहे. त्यावर ४५ लाख ५६ हजार ३१४ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती झाली आहे. त्यामधून ८५ हजार ७०० कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला असून त्यापैकी ११ हजार २५६ कुटूंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करु न देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हयातील अनेक मजूर कुटूंबांचे रोजगारानिमित्त होणारे स्थलांतर थांबविण्यास यश आले.सन २०१५-१६ या वर्षात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यंवंशी यांच्या विकासात्मक दृष्टीकोनातून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली १०० माजी मालगुजारी तलावांचे खोलीकरण व दुरुस्ती तसेच तलावांमध्ये मत्स्यसंवर्धन करुन मत्स्यव्यवसायाला चालना देणे तसेच वैयक्तिक लाभामध्ये पशुपालन गोठा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांनी या योजनेला आपलेसे केले असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद देत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)योजनेंतर्गत झाली ही कामेया योजनेंतर्गत ग्रामपंचायतीची मोठया प्रमाणात विकासाची कामे करण्यात येत आहे. मातीबांध, पांदण रस्ते, सिंचन विहीरी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, भात खाचर तयार करणे, शौचालय, नाला सरळीकरण, सिमेंट नाला बांध, तलाव गाळ काढणे, खोलीकरण, शेततळे, वनतळी, मैदान सपाटीकरण करणे अशा प्रकारची असंख्य कामे करण्यात येत आहे. योजनेच्या काटेकोर, नियोजनबध्द व प्रभावी अंमलबजाणीमुळे मजुरांच्या हाताला काम व गावाचा पायाभूत सुविधेसह विकास करण्यास ही योजना महत्वाची ठरली आहे.