शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामावर सधन लोकांची मजुरी!

By admin | Updated: May 29, 2016 02:07 IST

पूर्वीच्या रोजगार हमी योजना कामासंबंधी रोजगार हमी काम कमी, अर्धे तुम्ही, अर्धे तुम्ही असे खुलेआम बोलल्या जात होते.

बोंडगावदेवी : पूर्वीच्या रोजगार हमी योजना कामासंबंधी रोजगार हमी काम कमी, अर्धे तुम्ही, अर्धे तुम्ही असे खुलेआम बोलल्या जात होते. आताच्या मग्रारोहयोबाबतीत काम कमी दाम जास्त म्हणून तर सधन लोकांची उपस्थित जास्त असे चित्र आजघडीला परिसरातील रोहयो कामावर पाहायला मिळत आहे. स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने गावामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे. गावातील जॉब कार्ड धारकांना वर्षभरातून कुटुंबातील एका व्यक्तीला किमान १०० दिवस रोजगाराची संधी मिळावी असा दंडक आहे. आज गावातील गोरगरीब मजुरांना रोजगाराची संधी गावातच मिळावी, पोटासाठी ग्रामस्थांना वनवन भटकावे लागू नये म्हणून महाराष्ट्र गामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावोगावी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्या गावागावात इतरत्र दुसरे काम उपलब्ध नसल्याने अख्या गावकऱ्यांनी पसंती मग्रारोहयो कामाला प्राधान्याने दिसत आहे. गावातील मजूर ‘नमुना-४’ भरून कामाची मागणी ग्रामपंचायतकडे करतात. गावामधील भूमिहीन, अल्पभूधारक, कष्टकरी, नित्यनेम बारमाही मजुरीची मागणी करतात. परंतु ज्यांनी कधी आपल्या कुटुंबाच्या कामाव्यतिरिक्त इतरत्र कामासाठी भटकंती कधी केलीच नाही. ज्यांना कामाची आवश्यकता नाही, गावातील अशा सधन लोकांनी सुरू असलेल्या मग्रारोह योजनेच्या कामाला देखणी पसंती दाखविल्याचे दिसत आहे. परिसरातील कामावर फेरफटका मारला असता अनेक विचित्र किस्से आवर्जुन दिसून आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणारे सामान्य माणूस कामावर राबताना दिसतात. त्यांना रोजगाराची गरज आहे हे समजू शकते. परंतु जी व्यक्ती आपली शेती व आपल्या कुटुंबातील कामाव्यतिरीक्त, दुसऱ्यांच्या मजुरीवर कधीही गेले नाही, असे सधन माणसे आज मग्रारोहयो कामावर देखण्या उपस्थित आढळले. सध्या मग्रारोहयो कामावर रोजगार सेवकाचे नियंत्रण आहे. मग्रारोहयो कामावर पाहिजे त्या प्रमाणात श्रम खर्ची होत नसल्याने अनेकांची पसंती त्या कामावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कामापेक्षा दाम जास्त असल्याने अनेकांची झुंबड उडते.(वार्ताहर)