शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

गिधाडी येथे रोहयोत भ्रष्टाचार

By admin | Updated: July 2, 2016 02:02 IST

गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गिधाडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात

ग्रा.पं. सदस्यांचा आरोप : खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदनगोंदिया : गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गिधाडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य सचिन नांदगाये यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी खंडविकास अधिकारी यांना निवदेन दिले आहे.प्राप्त माहितीनुसार, गिधाडी येथे मागील सहा महिन्यापूर्वी अकुशलमध्ये प्रेमलाल ठाकरे ते भागवत रहांगडाले यांच्या शेतातपर्यंत ५५० मीटर पांदन रस्ता व मागील दोन वर्षांपूर्वी अकुशलमध्ये भास्कर पटले ते छगनलाल जयतवार यांच्या शेतापर्यंत ७५० मीटर पांदन रस्ता बनविण्यात आला होता. सदर दोन्ही पांदन रस्त्यांवर सन २०१६-१७ मध्ये मागील २० दिवसांपूर्वी ५५० मीटर लांब असलेल्या पांदन रस्त्याचे १२८ ब्रॉस मुरूम अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आले. तसेच दुसऱ्या ७५० मीटर पांदन रस्त्यावर १४५ ब्रॉस मुरूम अंदाजपत्रकात समाविष्ट असून १२८ ब्रॉस व १४५ ब्रॉस मुरूमाची लीज ग्रामपंचायतद्वारे काढण्यात आली.सदर कामात नियमाप्रमाणे मजुरांना काम मिळण्याच्या दृष्टीने मजुरांच्या हातून खोदकाम करणे गरजेचे होते. तशी अंदाजपत्रकात तरतूदसुद्धा आहे. परंतु सरपं रेखा संजय मेश्राम, सचिव मनिष यू. खाडे, कंत्राटी अभियंता व ग्रामरोजगार सेवक नरेंद्र रहांगडाले यांनी नियमांना धाब्यावर ठेवून स्वत:च्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करण्याच्या दृष्टीने दोन्ही पांदन रस्त्याच्या मुरूम खोदाईचे काम जेसीबीद्वारे करण्यात आले. त्यामुळे गावातील अनेक मजूर सदर योजनेच्या कामापासून वंचित ठरले आहेत.तसेच सदर ५५० मीटर पांदन रस्त्यावर १२८ ब्रॉस मुरूम घालणे आवश्यक होते. परंतु केवळ ७८ ब्रॉस मुरूम टाकून पसरविण्यात आले. तर ७५० मीटर असलेल्या पांदन रस्त्यावर १४५ ब्रॉस मुरूम टाकणे गरजेचे असताना फक्त ९५ ब्रॉस मुरूम टाकून तात्काळ पसरविण्यात आले. यात सदर पदाधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार करण्याच्या दृष्टीने संगनमत केले होते. सदर कामे संबंधित अभियंता यांच्या देखरेखीत करणे गरजेचे होते. परंतु कंत्राटी अभियंता ५५० मीटर पांदन रस्त्यावर एकही दिवस आले नाही. दुसऱ्या थछ० मीटर पांदन रस्त्यावर एक दिवस भेट दिली. सदर दोन्ही रस्त्यांवर मुरूम पसरविण्याचे काम मजुरांना रोजंदारीने देणे आवश्यक होते. परंतु प्रति ब्रॉस ६० रूपये प्रमाणे ठेक्यामध्ये केवळ आठ ते १० मजुरांना देण्यात आले. या प्रकारामुळे सरपंच रेखा संजय मेश्राम, सचिव मनिष यू. खाडे, कंत्राटी अभियंता, रोजगारे सेवक नरेंद्र रहांगडाले यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट आहे.