शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोची कामे यंत्रणांनी समन्वयातून करावी

By admin | Updated: May 18, 2017 00:17 IST

मजूरीनिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यात रोजगार हमी योजना यशस्वी ठरली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन

राजकुमार बडोले : रोजगार हमी योजनेची आढावा बैठक लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मजूरीनिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यात रोजगार हमी योजना यशस्वी ठरली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबत अनेक विकास कामे करण्याची क्षमता या योजनेत आहे. जिल्ह्यात या योजनेतून ग्रामविकास व वैयक्तीक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत सोमवारी (दि.१५) ते बोलत होते. सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, रोहयो अंतर्गत कामाचे नियोजन मोठ्या प्रमाणात दिसते, परंतु प्रत्यक्षात कामे कमी करण्यात येतात. प्रत्यक्षात जी कामे रोहयो अंतर्गत करायला पाहिजे ती होत नाही. तलावातील गाळ काढण्याचे नियोजन देखील रोजगार हमी योजनेतून करण्यात यावे. जी कामे आपण करणार आहोत ती दिर्घकाल टिकाऊ स्वरुपाची राहतील यासाठी चांगल्या प्रकारचे अंदाजपत्रक तयार करावे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि शेतातील उत्पादित माल घरी किंवा बाजारपेठेत पोहचविण्यासाठी चांगल्या प्रकारचे पांदण रस्ते मोठ्या प्रमाणात तयार करावेत असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी काळे यांनी, रोजगार हमी योजनेतून पांदण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात येतील. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुम टाकण्यात येईल, त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल. १०० दिवस जिल्ह्यातील मजूरांना रोजगार कसा मिळेल याचे नियोजन रोहयो विभागाने करावे. ग्रामरोजगार सेवकांना कामाच्या जबाबदाऱ्या देवून कामे करु न घेण्यात येतील. तालुक्याचे नियोजन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी एकत्र बसून करावे, असे त्यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी, कुशल कामाचे मागील वर्षीचे १६ कोटी रु पये शासनाकडे थकीत आहे, ते त्वरीत मिळाल्यास संबंधितांना देता येईल. १२ मे पर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत जिल्ह्यात ८४५ कामे सुरु असून यावर ५३ हजार २६२ मजूरांची उपस्थिती होती. तर यंत्रणांची ३४४ कामे सुरु असून यावर १६ हजार १७३ मजूरांची उपस्थिती असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच रोहयोची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.