शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आमगावातील रस्ते चिखलात

By admin | Updated: July 17, 2016 00:19 IST

आमगाव शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दरवर्षी दुरूस्ती व पूर्ण बांधकामावर शासनाकडून निधी खर्च करण्यात येते.

नागरिकांना प्रचंड त्रास : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह आमगाव : आमगाव शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दरवर्षी दुरूस्ती व पूर्ण बांधकामावर शासनाकडून निधी खर्च करण्यात येते. परंतु नियोजनबध्द व कामावरील अनियमिततेमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मागील वर्षी बांधकाम झालेले डांबरीकरण रस्ते खड्यात व चिखलमय झाले आहे. या रस्त्यावरील मार्गक्रम करतांना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. आमगाव ग्रामीण भागातील आमगाव पाऊलदौना, तिगाव, मुंडीपार, सुपलीपार, कातुर्ली, शिवनी, जवरी, सावंगी या मार्गावरील डांबरीकरण रस्ते दुरूस्ती व बांधकाम करण्यात आले. परंतु योग्य नियोजनाअभावी या रस्त्यांची वाताहात झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पडले. त्याते पाणी साचल्याने मार्गक्रम करणाऱ्यांसाठी हे खड्डे धोक्याची घंटा वाजवित आहेत. आमगाव, मुंडीपार, कट्टीपार व कालीमाटी या मार्गावरील रस्त्यांची वाताहात आहे. कालीमाटील घाटटेमनी, भोसा, कातुर्ली मार्ग डांबरीकरण रस्त्याअभावी खड्यात रुपांतर झाले आहे. जामखारी, तिगाव, पाऊलदौना, कुंभारटोली या गावातील मुख्य मार्ग डांबरीकरण रस्त्यांच्या दैनावस्थेमुळे चिखलमय झाले. एक ते दीड फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. तीच अवस्था किंडगीपार, जवरी व शिवनी मार्गावर दिसत आहे. परंतु संबंधीत विभागाने दखल घेतली नाही. या मार्गावरील नियोजनबध्द बांधकामाला लोकप्रतिनिधींनीच पाठ फिरविल्याने यापूर्वी झालेल्या बांधकामावरील निधी पाण्यात गेला. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात २०१४-१५ व २०१५-१६ या आर्थिक वर्षात डांबरीकरण रस्ते बांधकाम व दुरूस्ती करण्यात आली. या बांधकामावर निधीचा खर्च करण्यात आला. परंतु बांधकाम नियोजनबध्द व योग्य बांधकामाअभावी सदर रस्ते पुन्हा पावसाळ्यात वर्ष लोटण्याआधी खड्यात रुपांतरीत झाले. आमगाव शहरातील मुख्य रस्ते दरवर्षी बांधकाम व दुरुस्ती करूनही खड्यात का रुपांतरीत होतात हा संशोधनाचा विषय नागरिकांसाठी आहे. नगरातील गांधी मार्ग ते नटराज मार्ग, बाजार समिती मार्ग, कामठा चौक मार्ग, लांजी मार्ग, पंचायत समिती मार्ग, किडंगीपार बायपास मार्ग, आंबेडकर मार्ग ते कुंभारटोली मार्गावरील दरवर्षी दुरूस्ती व बांधकाम झाल्यावरही या रस्त्यांची दैनावस्था कायम आहे. संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांच्या अनियमिततेमुळे बांधकाम निकृष्टपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची वाताहत झाली आहे. रस्त्यांवर मार्गक्रमन करण्यासाठी नागरिकांना पायी चालणे कठीण झाले आहे. या निकृष्ट रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनामुळे नागरिकांना अपघातांना समोर व्हावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी) पूर्ण रस्त्यांच्या बांधकामाची मागणी आमगाव शहर व ग्रामीण भागातील दरवर्षी रस्ते दुरूस्ती व बांधकाम नियोजनाला शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जातो. परंतु सदर बांधकाम करण्यासाठी लोकप्रतिनिधीच कंत्राटदार म्हणून पुढे येतात. त्यामुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी या कामातील कंत्राट घेऊन कामे करीत असल्याने योग्य बांधकामाची शास्वती नाही. मागील पाच वर्षातील लेखाशिर्ष यावरून एकाच रस्त्यांचे वारंवार नियोजन झाल्याचे निदर्शनात येईल. परंतु बांधकामाची दैनावस्था सुधारली नाही. त्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सर्व रस्ते पुन्हा तयार करण्याची मागणी होत आहे.