शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रोखून दर्शविला विरोध

By admin | Updated: May 15, 2015 00:47 IST

शासनाच्या भू-संपादन कायद्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता रस्त्यावर उतरले असून यातूनच गुरूवारी (दि.१४) राष्ट्रव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

देवरी/रावणवाडी : शासनाच्या भू-संपादन कायद्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता रस्त्यावर उतरले असून यातूनच गुरूवारी (दि.१४) राष्ट्रव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या राष्ट्रव्यापी आंदोलनांतर्गत गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे मुख्य मार्गावर तसेच देवरी तालुक्यातील चिचगड मार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे रावणवाडी येथे भाकपच्या कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली. भू-संपादन कायदा २०१३ मध्ये संशोधन करून सत्तेत आलेली भाजप शासन विदेशी भांडवलदार, कारखानदार, भू-माफिया व बिल्डर्सच्या हितास्तव नवीन भू संपादन कायदा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर नव्याने तयार करण्यात येणारा कायदा शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण जनतेसाठी घातक असल्याचे कारण पुढे करीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याचा विरोध करीत आहे. आपला विरोध दर्शविण्यासाठी भाकपने राष्ट्रव्यापी आंदोलन झेडले असून त्यांतर्गत गुरूवारी (दि.१४) जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत रावणवाडी येथे मुख्य मार्गावर भाकप कार्यकर्त्यांनी दुपारी १.३० वाजता रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे २० मिनीटे अवरूद्ध झाली होती. तर आंदोलनाला बघता पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान मंडळ अधिकारी अशोक कोरे यांना भू संपादन अध्यादेश रद्द करणे तसेच अदानी पावर प्रोजेक्ट, बिरसी एअरपोर्ट व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील कित्येक कित्येक शेतकरी प्रभावीत झालेत. त्यांचे पूनर्वसन करून रोजगाराची व्यवस्था करण्याची मागणी असलेले निवेदन देण्यात आले. पश्चात सुमारे ५०-६० कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. मोर्चात भाकपचे जिल्हा सहसचिव रामचंद्र पाटील, तालुका सचिव करूणा गणवीर, तालूका सहसचिव प्रल्हाद उके, छन्नू रामटेके, क्रांती गणवीर, ताराचंद डोमळे, जितेंद्र गजभिये, सत्यपाल उके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर देवरी येथे देवरी शाखेने मोर्चा काढून चिचगड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या मोर्चाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव शेखर कनोजिया यांनी केले. आंदोलनांतर्गत भू-संपादन कायद्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे चिचगड मार्गावरील वाहतूक काही काळ अवरूद्ध झाली होती. दरम्यान भू-संपादन कायदा रद्द करणे, वनहक्क जमीन अतिक्रमण करणाऱ्यांना पट्टे द्या, रोहयो अंतर्गत कामात प्रती कुटूंब दोन व्यक्तींना कामे द्या, २०० दिवस कामे देऊन ३०० रूपये मजूरी द्या आदि मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुयर्वंशी यांना देण्यात आले.