राजकुमार भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील सडक-अर्जुनी-शेंडा रस्त्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. रस्ता बांधकामासाठी अर्धवट कामासाठी खोदून ठेवलेल्या रस्ता आणि रस्त्यावर ठेवलेल्या साहित्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.अताशा आशिर्वाद बिल्डर्स नागपूर यांच्याकडे सदर रस्त्याचे काम आहे. या कामाची अंदाजे किमत २२ कोटी रुपये असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये २ किलो मीटर हा रस्ता सिमेंटीकरण असल्याचेही सांगितले. कामाची मंजुरी १४ नोव्हेंबर २०१८ ची असून काम संपविण्याचा अवधी हा १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. एवढ्या मोठ्या कामासाठी काम करणारी यंत्रणा फारच मात्र तुटपुंजी आहे. अतिशय कमी मजूर कामावर असल्यामुळे कंत्राटदाराचे कामावर पूर्ण दुर्लक्ष आहे. सडक-अर्जुनी ते ग्रामीण रुग्णालय पर्यंतचा एक किलोमीटर रस्ता हा सिमेंट रोड असणार असल्यामुळे मोठ्या नाल्याचे काम मागील वर्षीपासून सुरु आहे. एक वर्ष लोटूनही एक कि.मी. सिमेंट क्रांकीट नाल्याचे बांधकाम पूर्ण होवू शकले नाही.अनेक ठिकाणी नाल्याचे खोदकाम करुन ठेवले परंतु बाजूची जागा भरण टाकून भरल्या गेली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात झाले आहे. नाल्याच्या बाजूचे खोदकाम केलेली जागा भरण टाकून भरल्यास योग्य होईल. परंतु तसे मात्र दिसून येत नाही. रस्त्याच्या बाजूला मुरुम,गिट्टी पडलेली असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. केसलवाडा, रेंगेपार, उशिखेडा आणि शेंडा या गावांना जाण्यासाठी नागरिकांना रस्त्याच्या धुळीचा सामना करावा लागतो. उलट दुचाकी व चारचाकी वाहने पंचर होतात ते अलग. एखादा रुग्ण आणायचे म्हणजे फार मोठे संकट आहे.सदर कामाची देखरेख व्हावी याकरिता तांत्रीक मंडळी आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (सावंगी) या अंतर्गत या कामावर नियंत्रण ठेवते. परंतु सदर कामावर लक्ष फक्त कार्यालयातूनच दिले जात असल्याचे निदर्शनास येते. रस्ता आणि नाल्याची अवस्था पाहिली तर लक्षात येते की सदर कामावर कोणतीही देखरेख नाही. कंत्राटदाराच्या जसे मनात येईल तशा प्रकारचे काम आणि निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. या रस्ता बांधकामाकडे उपविभागीय बांधकाम विभागाने लक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.कामे व्यवस्थित करावी आणि रस्ता बांधकामाची गती वाढवावी असे मी वारंवार कंत्राटदाराला सांगितले आहे. परंतु कंत्राटदार लक्ष देत नाही.- प्रकाश लांजेवार,उपविभागीय अभियंता, कार्यालय सडक-अर्जुनी (सावंगी)
सडक अर्जुनी-शेंडा रस्ता ठरतोय प्रवाशांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST
अताशा आशिर्वाद बिल्डर्स नागपूर यांच्याकडे सदर रस्त्याचे काम आहे. या कामाची अंदाजे किमत २२ कोटी रुपये असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये २ किलो मीटर हा रस्ता सिमेंटीकरण असल्याचेही सांगितले. कामाची मंजुरी १४ नोव्हेंबर २०१८ ची असून काम संपविण्याचा अवधी हा १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. एवढ्या मोठ्या कामासाठी काम करणारी यंत्रणा फारच मात्र तुटपुंजी आहे.
सडक अर्जुनी-शेंडा रस्ता ठरतोय प्रवाशांची डोकेदुखी
ठळक मुद्देकंत्राटदाराची मनमानी : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष