शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

दिलेली जमीन परत करा

By admin | Updated: May 14, 2015 00:49 IST

तालुक्यातील भजीयापार येथील ४१ कुटुंबातील शेतकऱ्यांना नोकरीचे आमिष तसेच गौशाळा विकासाच्या भूलथापा देत ...

शेतकऱ्यांची मागणी : पत्रपरिषदेतून दिला आत्महत्येचा इशाराआमगाव : तालुक्यातील भजीयापार येथील ४१ कुटुंबातील शेतकऱ्यांना नोकरीचे आमिष तसेच गौशाळा विकासाच्या भूलथापा देत पाऊलदौना येथील ग्रामोस्थान संस्थेने शेतकऱ्यांकडून ६.३९ हे.आर. जमीन दान स्वरूपात मिळविली. परंतु सलग २९ वर्षापर्यंत कोणताच विकास किंवा केलेला करार पूर्ण न करता या जमिनीपासून खासगी उत्पन्न मिळविण्यासाठी गौण खनीज अवैधपणे काढले जात आहे. त्यामुळे दान स्वरूपात दिलेली जमीन परत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारला असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भजियापार येथील शेतकऱ्यांना गौविकास, गावविकास तसेच नोकरीचे आमिष देत ग्रामोस्थान संस्थेच्या संचालकांनी शेतकऱ्यांकडून जवळपास १६ एकर जमीन सन १९८६ मध्ये दान स्वरूपात मिळवून घेतली. परंतु या जमिनीचा कोणताच विकास संस्थेने केला नाही. तर सलग २९ वर्षांपर्यंत कागदावर उपयोग घेऊन शेतकऱ्यांना मिळत असलेल्या उत्पन्नावरही डल्ला मारला. शेतकऱ्यांकडून मिळविलेली जमीन हातातून जाऊ नये यासाठी संचालकांनी जमीन घेताना शेतकऱ्यांना विविध आमीष दिले. परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. त्यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांना हातातून गेलेल्या जमीनीमुळे आर्थिक समस्यांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोणताच विकास न झालेली जमीन हक्काने परत मिळावी यासाठी संस्थेकडे सन २००८ मध्ये रितसर अर्ज केले. परंतु संस्था संचालकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु ठेवली. यामुळे हलाखीचे जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांपुढे उत्पन्नाअभावी मरणासन्न परिस्थिती पुढे आली. शेतजमीन परत मिळविण्यासाठी त्यांनी संस्थेकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने आता शासनाकडे धाव घेतल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर जमीन परत न मिळाल्यास ४१ शेतकरी कुटुंबीयांनी आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या जमिनी परत करू : शिवणकर ग्रामोस्थान संस्थेने शेतकऱ्यांच्या जमिनी दान स्वरूपात घेतल्या. परंतु या जमीनीवर कोणताच विकास झाला नाही. शेतकऱ्यांनी संस्थेकडे व धर्मदाय आयुक्त विभागाकडे रितसर अर्ज करावे त्यांच्या जमीनी परत करू असे मत ग्रामोस्थान संस्थेचे अध्यक्ष व माजी वित्तमंत्री प्रा. महादेवराव शिवणकर यांनी प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.