शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध शिथिल झाले, कोरोना नव्हे...()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. मात्र याचा अनेकांनी चुकीचा अर्थ ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. मात्र याचा अनेकांनी चुकीचा अर्थ लावत शहरातील बाजारपेठ आणि दुकानांमध्ये गर्दी केली होती. जणू कोरोना पूर्णपणे निघून गेल्याच्या आविर्भावात नागरिक वावरत होते. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही टळला नसून पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. केवळ निर्बंध शिथिल झाले कोरोना नव्हे हे सांगण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.१) काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. दीड महिन्यापासून सर्व उद्योगधंदे, दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांचा रोजगार गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी सुध्दा रुळावरुन घसरली होती. याला गती देण्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केपेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहे. यातंर्गत मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत तर इतर दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली. तब्बल दीड महिन्यानंतर सर्वच दुकाने उघडल्याने शहरवासीयांनी सकाळी बाजारपेठ आणि दुकानांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे संपल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत आणि दुकानांमध्ये वावरताना नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा सुध्दा विसर पडल्याचे चित्र होते.

.......

इतर दुकानांच्या वेळेत वाढ करा

अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने केवळ सकाळी ११ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र केवळ चार तासच इतर वस्तूंची दुकाने उघडी राहत असल्याने ग्राहकांची गर्दी होत असून व्यावसायिकांना सुध्दा पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता इतर दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे.

..........

नागरिकांनो नियमांचे करा पालन

कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. मागील दीड महिना जशी आपण स्वत:ची आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तशीच काळजी यापुढे सुध्दा घ्या, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा नियमित वापर करा, बाजारपेठेत गर्दी करु नका. अन्यथा आपले थोडेही दुर्लक्ष कोरोना संसर्गाला पुन्हा आमंत्रण देऊ शकते.

..........

व्यावसायिकांमध्ये थोडी खुशी थोडा गम

जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने केवळ सकाळी ११ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. तब्बल दीड महिन्यानंतर दुकाने सुरु झाल्याने व्यावसायिकांमध्ये थोडी खुशी होती तर केवळ चार तासच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने थोडे नाराजीचे वातावरण होते.