शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध शिथिल झाले, कोरोना नव्हे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.१) काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. दीड महिन्यापासून सर्व उद्योगधंदे, दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांचा रोजगार गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी सुध्दा रुळावरुन घसरली होती.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी गर्दी : नियमांचे पालन करण्याचा विसर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. मात्र याचा अनेकांनी चुकीचा अर्थ लावत शहरातील बाजारपेठ आणि दुकानांमध्ये गर्दी केली होती. जणू कोरोना पूर्णपणे निघून गेल्याच्या आविर्भावात नागरिक वावरत होते. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही टळला नसून पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. केवळ निर्बंध शिथिल झाले कोरोना नव्हे हे सांगण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.१) काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. दीड महिन्यापासून सर्व उद्योगधंदे, दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांचा रोजगार गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी सुध्दा रुळावरुन घसरली होती. याला गती देण्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केपेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहे. यातंर्गत मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत तर इतर दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. तब्बल दीड महिन्यानंतर सर्वच दुकाने उघडल्याने शहरवासीयांनी सकाळी बाजारपेठ आणि दुकानांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे संपल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत आणि दुकानांमध्ये वावरताना नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा सुध्दा विसर पडल्याचे चित्र होते. इतर दुकाने राहणार आता दुपारी २ पर्यंत सुरुजिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी मंगळवारी सुधारित आदेश काढीत अत्यावश्यक सेवे शिवाय इतर दुकाने सुध्दा बुधवारपासून (दि.२) दुपारी २ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे व्यावसायींकाना मोठा दिलासा मिळाला आहे. दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात आली असली तरी दुकानदार आणि ग्राहकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. अन्यथा कारवाईला पुढे जावे लागले.  

नागरिकांनो नियमांचे करा पालन  कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. मागील दीड महिना जशी आपण स्वत:ची आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तशीच काळजी यापुढे सुध्दा घ्या, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा नियमित वापर करा, बाजारपेठेत गर्दी करु नका. अन्यथा आपले थोडेही दुर्लक्ष कोरोना संसर्गाला पुन्हा आमंत्रण देऊ शकते. 

 व्यावसायिकांमध्ये थोडी खुशी थोडा गमजिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने केवळ सकाळी ११ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. तब्बल दीड महिन्यानंतर दुकाने सुरु झाल्याने व्यावसायिकांमध्ये थोडी खुशी होती तर केवळ चार तासच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने थोडे नाराजीचे वातावरण होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या