शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वाईट गोष्टींना लगाम स्वत:पासूनच घाला

By admin | Updated: August 12, 2015 02:16 IST

तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पाहिजे तसा तरुणाचा ज्ञानार्जनाकडे कल नाही. उच्चपणाचा

लोकमत परिचर्चा : युवा वर्गाने दाखविले जागरूक आणि सामाजिक भानगोंदिया : तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. पाहिजे तसा तरुणाचा ज्ञानार्जनाकडे कल नाही. उच्चपणाचा आव दाखवून समाजात वावरणाऱ्या तरुणांची नैतिकता ढासळत आहे. याचे कारण आजच्या काळात तरुणांमध्ये संस्कारक्षम अशी वातावरण निर्मिती नाही. आई-वडिलांकडून मुलांना ध्येयपुर्तीचे धडे दिले जात नसल्यामुळे तरुण भरकटला आहे. जगाकडे पाहताना प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पण युवा वर्गाने भरकटून जाणे योग्य नाही. स्वत:वर लगाम घालण्याची आणि चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासून केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते, असा सूर युवक-युवतींनी लावला.लोकमत कार्यालयात मंगळवारी आयोजित परिचर्चेत हे महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षणासोबतच स्पर्धा परिक्षेत कसा टिकाव धरता येईल यासाठी सुरुवातीपासूनच शाळेत शिकवले गेले पाहिजे. आधी शाळांमध्ये देशभक्तीचे धडे दिले जात होते. परंतू आता देशभक्ती सोडा इतिहासही आपण विसरत चालल्याची खंत तरुणांनी व शिक्षकांनी व्यक्त केली. सुरुवातीपासून विद्यार्थी वर्गाला संस्कारमय व देशभक्तीची भावना जागृत करणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. तरुणांनी शिक्षणाप्रती प्रामाणिकता दाखवून चांगल्या गुणांनी पुढे आले तरी त्यांना येथील व्यवस्थेपुढे हतबल व्हावे लागते. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे स्वत: आपल्यात व्यवसाईक अभ्यासक्रमाकडे वळले पाहिजे. आई-वडिलांनी आपल्या पालकांवर आपल्या ईच्छा लादू नये. त्यांना त्यांच्या ईच्छेप्रमाणे त्या-त्या क्षेत्रात जाऊ द्यावे. शिक्षणाची बाजारीकरण झाले असून शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ही व भाषेमध्येही दुजाभाव केल्या जातो. नोकरी व पैशांमुळे गुणवत्तेची कदर राहिली नाही. शिक्षण महत्वाचे साधन असले तरी आज शिक्षणाला पैशापुढे नतमस्तक व्हावे लागते. शिक्षणामुळे विवेकवादी व्यक्ती घडतो. या व्यवस्थेने गुणवत्तेला स्तब्ध केले. समाजात वावरताना अनेक तरुणांना समस्यांची जाणीव आहे. परंतु कळते पण वळत नाही या म्हणीप्रमाणे तरुणांनी समाजातील समस्यांकडे लक्षपुर्व दुर्लक्ष केले. समाज सेवेचे किंवा देशसेवेचे व्रत अंगीकारावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु आई-वडिलांना वाटतो भगतसिंगाने जन्म घ्यावा, परंतु तो माझ्या घरी नाही शेजारच्या घरी व्हावा या वृत्तीमुळे आज देशभक्ती तरुणांमधून कमी होत असल्याचे ते म्हणाले.तरुणांना सामाजिक नेतृत्व नसल्यामुळे आज तरुण वर्ग भरकटला जात असून देशाची मोठी हाणी होत आहे. आजचा तरुण व्यवसानांना फॅशन करुन बसला आहे. आपण व्यसन केले तर आपली मोजणी उच्चभ्रू लोकांमध्ये होते असा गैरसमज आज नवतरुणांना होत आहे. जो सिगारेट ओढत नाही, दारु पीत नाही अशा तरुणांना ‘ओल्ड फॅशन’चा तरुण म्हणून त्याची टिंगल उडवली जाते. परंतु जिवनाचे सार्थक करण्यासाठी व्यसनांना दूर ठेवणारा तरुण देशाचे उज्वल भविष्य घडवू शकतो. हे आज तरुण विसरला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा बचाव करण्यासाठी वृक्ष संवर्धनाकडे तरुणांनी लक्ष घालून समाज सेवेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कौटुंबिक वातावरणामुळे व मित्रांच्या सहवासामुळे तरुण व्यसनाकडे वळतो. त्यामुळे आई वडिलांनी मुलांच्या सहवासाकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. आज स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात आहे. परंतु बोटावर मोजण्याइतके या फोनचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात. परंतु या स्मार्ट फोनचा वापर वाईट कामासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. वॉट्स अ‍ॅप वर ग्रुपमध्ये चॅटिंग करताना त्या ग्रुपमध्ये त्या तरुणांच्या आई-वडिलांनाही जोडले तर या ग्रुपवर चुकीचे संदेश टाकले जाणार नाही. व तरुणांना दिशाहिन करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. या परिचर्चेत नमाद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.बबन मेश्राम, गोंदिया पब्लिक स्कूलच्या शिक्षिका वर्षा भांडारकर, नुतन खोब्रागडे, निखिल बोरकर, करुणा कडव, भारत टेंभुर्णेकर, वैभव शहारे, शाम नागज्योती, गुणेश्वर बिजेवार, भुपेंद्र गजभिये, अक्षय चव्हाण, प्रतिक सोनवाने आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)