शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे कोट्यवधी रूपये शेतकऱ्यांवर बाकी

By admin | Updated: June 28, 2017 01:23 IST

शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे व त्यांनी दुसरे पीकसुद्धा घ्यावे. पहिल्या पिकासाठीसुद्धा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये,

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे व त्यांनी दुसरे पीकसुद्धा घ्यावे. पहिल्या पिकासाठीसुद्धा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, याच उद्देशाने जलसंपदा विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पाणी वितरण संस्थांचा निर्माण करण्यात आला. या संस्थांच्या माध्यमातून पाण्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जात आहे. परंतु शेतकरी पाण्याचे कर भरत नसल्याने त्यांच्यावर १६ कोटी ९० लाख ९६ हजार रूपयांचे पाणी कर बाकी आहे. जिल्ह्यात वाघ व इटियाडोह विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात सहजतेने पाणी पोहोचावे यासाठी पाणी वितरण संस्था तयार करण्यात आल्या. या संस्थांच्या माध्यमातून पाणी वितरणाची व्यवस्था योग्यरित्या चालविली जात आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान वाघ विभागाने सिंचनासाठी उपलब्ध केलेल्या पाण्याचा कर २८.३२ लाख रूपये वसूल केले आहे. गैरसिंचन सुविधेसाठी देण्यात आलेल्या पाण्याचे कर ६.१६ लाख रूपये वसूल करण्यात आले आहे. या विभागाचे शेतकऱ्यांवर नऊ कोटी १५ लाख ५७ हजार रूपये एवढी रक्कम बाकी आहे. त्यातच इटियाडोह विभागाने सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या पाण्याचे कर एक कोटी नऊ लाख ६१ हजार रूपये वसूल केले आहे. गैरसिंचनासाठी उपलब्ध केलेल्या पाण्याचे कर १३.६१ लाख रूपये आहे. इटियाडोह विभागाच्या पाण्याचे कर शेतकऱ्यांवर सात कोटी ७५ लाख ३९ हजार रूपये बाकी आहे. वाघ व इटियाडोह दोन्ही विभागांचे पाणी कर १६ कोटी ९० लाख ९६ हजार रूपये बाकी आहे. केवळ आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्येच नव्हे तर अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर या विभागांची बाकी रक्कम प्रलंबित पडून आहे. पाणी तर घ्यावे मात्र त्याचे कर भरू नये, अशी शेतकऱ्यांची मानसिकताच बनली आहे. विशेष म्हणजे पाणी वितरणाच्या सहकारी संस्थांना याच्या वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत व वसुलीच्या रकमेतून अर्धी रक्कम संबंधित संस्थांनाच वितरित केली जात आहे. ही रक्कम त्या संस्थांच्या विकासासाठी उपलब्ध केली जात आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे कर भरण्यास सांगितले जात आहे. परंतु पर्याप्त रक्कम मिळत नसल्याने पाणी वितरण संस्थांनासुद्धा लाभ मिळत नाही. शासकीय योजनांना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समस्या निर्माण होत आहे. जास्तीत जास्त कराची रक्कम भरावी, अशी शेतकऱ्यांना विनंती आहे. एच.वाय. छप्परघरे, कार्यकारी अभियंता, वाघ व इटियाडोह सिंचन विभाग, गोंदिया.