शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातून सामान्य ज्ञान परीक्षेला प्रतिसाद

By admin | Updated: November 19, 2016 00:44 IST

लोकमत सखी मंचतर्फे जिल्हाभरात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या परीक्षेला सखींची चांगलाच प्रतिसाद दिला.

गोंदिया : लोकमत सखी मंचतर्फे जिल्हाभरात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या परीक्षेला सखींची चांगलाच प्रतिसाद दिला.देवरीलोकमत सखी मनच देवरीतर्फे स्थानिक धुकेश्वरी सभागृहात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण ५० सखी सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत गणित, विज्ञान, इतिहास अशा विविध विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. यात प्रथम क्रमांक ज्योती रामटेककर, द्वितीय क्रमांक डिलेश्वरी बिंझाडे तर तृतीय क्रमांक गायत्री पारधी यांनी मिळविला. विजयी स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन स्मिता पिल्लेवार यांनी केले. आभार लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका शिप्रा तिराले यांनी मानले. कार्यक्रमासाठी लता बडोले, सोनिया माटे, पुष्पा कानेकर, मयूरी पारधी, रूपाली शाहू यांनी सहकार्य केले.सालेकसालोकमत सखी मंच सालेकसाच्या वतीने स्थानिक जानकीबाई विद्यालय येथे सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. यात एकूण ४० सखी सहभागी झाल्या. यात प्रथम क्रमांक रेखा टेंभरे, द्वितीय क्रमांक प्रीती माहुर्ले तर तृतीय क्रमांक तृप्ती गाढवे यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका जांगडे, शिक्षक-कर्मचारी आदिंनी सहकार्य केले. परीक्षण किरण मोरे व पराग फुंडे यांनी केले.तिरोडा लोकमत सखी मंच तिरोड्याच्या वतीने स्थानिक राजीव गांधी आयटीआय येथे सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. यात ६० सखींनी भाग घेतला. यात प्रथम क्रमांक सुलभा तितिरमारे, द्वितीय क्रमांक लीना कावडकर व तृतीय क्रमांक अभिलाषा गेडाम यांनी मिळविला. सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संचालन संयोजिका ममता दुबे यांनी केले. आभार आयटीआय संचालिका अर्चना नखाते यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. प्रमोद पारधी, प्रशांत टेंभरे, विजय पारधी, विलास बिसेन, किशोर लाडे यांनी सहकार्य केले.सडक-अर्जुनीलोकमत सखी मंच सडक-अर्जुनीच्या वतीने स्थानिक एम.बी. पटेल महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. यात ७० सखी सहभागी झाल्या. सखी मंचच्या सदस्यांना सुरूवातीला स्पर्धा परीक्षेबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संबंधित साहित्य पुरविण्यात आले. सदर परीक्षा शांततामय वातावरणात पार पडल्याचे सांगण्यात आले.प्रथम क्रमांक उषा जगताप, द्वितीय क्रमांक शीतल खोब्रागडे यांनी मिळविला. स्पर्धा परीक्षण हर्षा राऊत व लतिका कोटांगले यांनी केले. बक्षीस वितरण जि.प. सभापती वंदना डोंगरवार यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन हर्षा राऊत यांनी केले. आभार ज्योती बडोले यांनी मानले. (प्रतिनिधी)