शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोग्य सेवकावर कारवाईचा ठराव

By admin | Updated: June 4, 2015 00:49 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी जि.प.सभागृहात पार पडली. यावेळी आरोग्य विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले योजनेचे धनादेश ...

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी जि.प.सभागृहात पार पडली. यावेळी आरोग्य विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले योजनेचे धनादेश व मुदत ठेवीचे प्रमाणपत्र गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित ठेवणाऱ्या आरोग्य सेवकावर कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला.आरोग्य आणि पंचायत विभागाच्या कारभारावर ही सभा गाजली. दुपारी १ वाजता सुरू झालेली सभा सायंकाळपर्यंत सुरू होती. यावेळी जि.प.सदस्य राजेश चांदेवार यांनी आरोग्य विभागाचा प्रश्न उपस्थित करून संबंधित आरोग्य सेवक लांजेवार यांच्या हलगर्जीपणामुळेच लाभार्थ्यांना सावित्रीबाई योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप केला. त्यावर जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर त्यांनी याबाबतचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आणि संबंधितांना लाभ देणार असल्याचे सांगितले. आरोग्य व पशुसंवर्धन तसेच कृषी, पाणी पुरवठा या विभागांची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत आणि निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता कामांच्या ई-निविदा त्वरित प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सभेला सीईओ गावडे उपस्थित नव्हते. मात्र उपाध्यक्ष मदन पटले, सभापती सविता पुराम, मोरेश्वर कटरे, प्रकाश गहाणे, कुसन घासले व इतर ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)