शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

देशी दारूबंदीकरिता निवेदन

By admin | Updated: June 30, 2016 01:52 IST

येथील नवीन देशी दारू दुकानास परवाना देण्यात येवू नये, या मागणीसाठी महिला बचत गटाच्या महिलांनी सरपंचाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी

एकोडी : येथील नवीन देशी दारू दुकानास परवाना देण्यात येवू नये, या मागणीसाठी महिला बचत गटाच्या महिलांनी सरपंचाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी यांना दिले निवेदन.मागील दोन ते तीन वर्षांपासून एकोडी येथे रितेश जायस्वाल रा. मुरदाडा यांनी आपल्या खासगी जागेत घर बांधले. नंतर तयार करण्यात आलेल्या त्याच घरात देशी दारूच्या चिल्लर विक्रीचे दुकान सुरू करण्याकरिता ग्रामपंचायतला ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज केले होते. त्यानुसार जयस्वाल यांनी ७ मे २०१५ च्या तहकूब ग्रामसभेच्या ठराव-१ नुसार नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायतच्या जुलै २०१५ च्या निवडणुकीत नवीन सरपंच यांच्या आयोजित प्रथम ग्रामसभेत १५ आॅगस्ट २०१५ ला दिलेला ७ मे २०१५ च्या तहकूब ग्रामसभेचा ठराव १५ आॅगस्ट २०१५ च्या ग्रामसभेत विषय-२ नुसार सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. परंतु या नवीन उघडण्यात येणाऱ्या देशी दारू चिल्लर विक्री दुकानास गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात विरोध असून या प्रकरणाबाबत काही काही महिन्यांच्या अंतराने दारुबंदी राज्य उत्पादन शुल्क गोंदिया यांचे काही कर्मचारी एकोडी येथे येवून स्थानिक लोकांकडून देशी दारू दुकानासंबंधात न बोलता चौकशी करून जातात, असे अनेक लोकांकडून सांगण्यात येते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गावाच्या बाबतीत चुकीचा अहवाल सादर करुन खरी माहिती लपविण्याचा प्रकार होत आहे. या संबंधाने एकोडी येथील सरपंच व पं.स. सदस्य यांच्या नेतृत्वात गावातील बचत गटाच्या महिला व नागरिक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी व दारूबंदी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना देशी दारू चिल्लर विक्रीकरिता कोणत्याच प्रकारचा परवाना देण्यात येवू नये, याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात, महिला बचत गट व इतर महिलांचा मोठ्या प्रमाणात विरोध असून हे दुकान राज्य महामार्ग-२४९ ला लागून ३० फूट अंतरावर तयार करण्यात आलेल्या घरात सुरू करण्याबाबत जयस्वाल यांच्याकडून कार्यवाही सुरू आहे. परंतु अशाप्रकारचे नियमबाह्य काम सुरू करण्यास विरोध असून जवळच अनेक लोकांची घरे आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. गावात जी शांतता व सुव्यवस्था नांदत आहे त्याला छेद पडण्याचा धोका महिलांनी व्यक्त केला आहे. या दुकानामुळे गावात असलेल्या दारूड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. जर देशी दारू चिल्लर विक्री दुकानास परवाना दिल्यास महिला, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि नागरिकांकडून मोठे आंदोलन करुन विरोध करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)