शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव येथील खोड्या तलावाची दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम डोंगरगाव-खजरी या गावच्या उत्तरेकडे असलेल्या खोड्या तलावात नाल्यातील पाणी आणल्यास तलावात पाण्याची पातळी ...

सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम डोंगरगाव-खजरी या गावच्या उत्तरेकडे असलेल्या खोड्या तलावात नाल्यातील पाणी आणल्यास तलावात पाण्याची पातळी वाढून सिंचनासाठी त्याचा फायदा होईल. याकरिता खोड्या तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

डोंगरगावच्या वरच्या भागातून नाला वाहतो. पावसाळ्यात अनेकदा पूर येतो. या नाल्यावर मोठा बंधारा बांधल्यास बंधाऱ्याच्या माध्यमातून नाल्याचे पाणी सरळ शासकीय खोड्या तलावात येईल. पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर तलाव पुराच्या पहिल्या पाण्याने तुडुंब भरून जाईल. या तलावात नाल्याचे पाणी आणल्यास तलावातील पाण्याची पातळी वाढेल व विहिरी आणि जमिनीच्या सिंचनासाठी लाभ होऊन पाण्याची पातळी वाढेल. याशिवाय पावसाळ्यात शेतकऱ्यांना ओलितासाठी फायदा होईल. ही अतिक्रमण शेती हटवून उंच पार करावे, त्याचप्रमाणे रपट्याची उंची वाढवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण तलावाचे खोलीकरण केल्यास उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या भासणार नाही.

ही मागणी ग्रामपंचायत व गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून असून मंत्र्यांना निवेदन देऊनही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. आसपासच्या सर्व गावांसाठी फायद्याचा असणारा हा तलाव असल्याने खोड्या तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी तुळशीदास चौधरी, विनायक लांजेवार, यशवंत कठाणे, नीलकंठ कठाणे, नीलकंठ कोरे, मार्कंड कोरे, भानुदास डोये, सावजी हुकरे, यादव हुकरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष कुंडलिक लांजेवार, सदाराम भेंडारकर, कठाणे, अनिल कोरे, देवराव कोरे, अशोक हुकरे, पुरुषोत्तम राणे, उत्तमराव राणे,

आदींनी केली आहे.